पुणे हे महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. पुण्याची खाद्यसंस्कृती असो की पुण्याच्या पाट्या, येथील शिक्षणापासून प्रत्येक गोष्टी लोकप्रिय आहेl. सोशल मीडियावर पुण्यातील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रस्त्यावर फळे विक्रेता अनोख्या अंदाजात फळे विकताना दिसत आहे. त्याची ही अनोखी स्टाईल पाहून तुम्हीही त्याचे चाहते व्हाल. फळ विक्रेत्यांना फळांच्या मार्केटमध्ये मनासारखा भाव मिळत नाही तेव्हा हे फळ विक्रेते पोटा-पाण्यासाठी फळे विकताना दिसून येतात.
हा व्हायरल व्हिडीओ श्रीं माने दिघी-आळंदी रस्त्यावरील आहे. तुम्ही अनेकदा पाहिले असेल की रस्त्याच्या कडेला अनेक जण फळे किंवा अन्य वस्तू विकताना दिसून येतात. असाच एक फळ विक्रेता केळी,पपई, संत्री विकताना या व्हिडीओत दिसत आहे.या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की हा फळ विक्रेता डोक्यावर डझनभर केळी, हातात कापलेली पपई, आणि गळ्यात संत्रांची माळ घेऊन फळे विकतोय आणि तितक्याच लयबद्ध पद्धतीने फळांचा भाव सांगताना दिसत आहे. त्याचा हा अनोखा अंदाज कोणालाही आवडू शकतो. कोणीही त्याच्या या अनोख्या स्टाइलकडे आकर्षिक होऊ शकतो. याशिवाय रस्त्याच्या शेजारी झाडांना सुद्धा त्यांनी दोरीने फळे लावली आहे. विशेष म्हणजे फळे विक्रेत्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य दिसत आहे. त्यांचे हे हास्य पाहून तुमच्या चेहऱ्यावरही स्मित हास्य येईल.
हेही वाचा : VIDEO : काय सांगू राणी मला गाव सुटना! हातावरची गावाकडली इडली खाल्ली का? पाहा हा व्हायरल व्हिडीओ
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सनी या विक्रेत्याची ही स्टाइल खूप आवडली आहे. एका युजरने लिहिलेय, “हा चेष्टेचा आणि पुण्याचा विषय नाही आहे. तो त्याच्या कौशल्याने आणि मेहनतीने धंदा करत आहे. ” तर एका युजरने लिहिलेय, “रोज असतात हे काका दिघी रोडवर” आणखी एका युजरने लिहिलेय, “परिस्थिती!पैसे कमावण्यासाठी कष्ट”
iloovepune या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पुणे तिथे काय उणे..सर्व प्रकारची ताजीफळे मिळतील.श्रीं माने दिघी-आळंदी रोड…”