Pune Video : आज गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर सगळीकडे गणपतीचं मोठ्या जल्लोषात आगमन होत आहे. अशात पुण्यातील मानाचा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पुण्यातील सर्वात प्रसिद्ध गणपती म्हणून दगडूशेठ हलवाई गणपतीची ओळख आहे. फक्त गणेशोत्सवातच नाही तर दर दिवशी हजारो लोक या गणपतीच्या दर्शनासाठी येतात.
गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती नावाच्या सोशल अकाउंटवरुन गणपतीचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. सध्या या व्हिडीओची सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गणेशोत्सवाचा आनंद घ्यायचा असेल तर पुण्याला नक्की भेट द्या, असं आवर्जून म्हटलं जातं. ऐतिहासिक शहर असलेल्या पुण्याला गणेशोत्सवाचा सुद्धा खूप मोठा इतिहास लाभला आहे.
या व्हिडीओत तुम्हाला दगडूशेठ हलवाई गणपतीची सुंदर मुर्ती दिसेल आणि या मुर्तीसमोर हजारो भाविकांची गर्दी दिसेल.
व्हिडीओत मंदिराची आणि मंदिराभोवती केलेली सजावट सुद्धा दाखवण्यात आली आहे. अनेक गणेशभक्त बाप्पाबरोबर सेल्फी आणि फोटो सुद्धा काढताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. गणपतीच्या दर्शनासाठी लोकांची गर्दी पाहून तुम्ही थक्क व्हाल.

हेही वाचा : हेही वाचा : Nalinee Mumbaikar : १२ व्या वर्षी अंगावर स्वयंपाकाची जबाबदारी आली आणि….

shreemant_dagdusheth_ganpati_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
दरवर्षी गणेशोत्सवात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी भाविक तुडूंब गर्दी करतात. या रेकॉर्डब्रेक गर्दीमुळे दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर तगडा पोलिस बंदोबस्त सुद्धा दिसून येतो.