गणेशोत्सव म्हटलं की, बाप्पाच्या दर्शनासाठी मोठ्या मोठ्या रांगा लागणार, भाविकांची गर्दी होणारच. पण दरवर्षीपेक्षा यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान भाविकांची संख्या खूप जास्त होती. याची झलक शनिवारी-रविवारी दगडूशेठ गणपतीच्या बाप्पाच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांचा महापूर पाहून आली. गणेशोत्सवाचा शेवटचा आठवडा असल्याने शनिवार रविवार पासून मध्यवर्ती पुण्यामध्ये मोठी गर्दी पाहायला मिळते आहे. ही गर्दी अंगावर काटा उभा राहिला होता. एवढी गर्दी असेल तर धक्काबुकी होते, काही वेळातर गर्दी चेंगरतो की काय अशी भिती वाटते पण अशा गर्दीमध्ये लहान मुलांचे प्रंचड हाल होतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

येथे पाहा व्हिडीओ

हेही वाचा – लाडक्या बाप्पासाठी उकडीचे मोदक बनवत आहात? तज्ज्ञांकडून जाणून घ्या मोदकाचे फायदे

गर्दीत लेकरांचे हाल

पुण्यातील गणेशोत्सवादरम्यान दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी झालेल्या गर्दीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये भाविकांची प्रचंड गर्दी झालेली दिसत आहे आणि गर्दीमध्ये चिमुकल्यांचे हाल होत आहे. काही लोकांनी चिमुकल्यांना खांद्यावर घेतले आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “गर्दीमध्ये चिमुकल्यांचे हाल.”

चिमुकल्यांना या गर्दीचा कसलाही अंदाज नसतो ना कोणाला ढकलून पुढे जाण्याची ताकदही नसते. लहान लेकरांना पालक खांद्यावर बसवतात पण त्यातही आपण कुठे आहोत, हे काय सुरु आहे याची त्यांना काडीमात्र कल्पना नसते. त्यामुळे लहान लेकरांना गर्दीमध्ये आणू नये अशी विनंती केली जात आहे.

हेही वाचा – शिव-पार्वती विवाह सोहळा आता पुण्यात!, तुम्ही पाहिला का ‘हा’ जिवंत देखावा? Video होतोय Viral

लेकरांना गर्दीत घेऊन जाऊ नका

व्हिडीओवर कमेंट करत याबाबत अनेकांनी सहमती दर्शवली. एकाने प्रश्न विचारला, “एवढ्या गर्दीमध्ये तुम्ही लहान मुलांना घेऊन का येता?”

तिसरा म्हणाला, “महापालिकेने गर्दीचे शून्य नियोजन”

चौथ्याने लिहिले की, “लहान मुलांना गर्दी त घेऊन जाऊ नका”

पाचव्याने सांगितले, एवढ्या गर्दीत लहान लेकरांना आणू नये, ते दमून जातात, चिडचिड करतात. स्वत: पण काही बघत नाही आणि पालकांना पण मज्जा घेऊन देत नाही, त्या पेक्षा मुलांना आजी-आजोबांकडे घरी सोडा.

सहाव्याने लिहिले, गणेशमंडळाने थोडे तरी नियोजन केले पाहिजे खूप हाल होतात लहान मुलांचे, शिवाय मोठ्यांनाही हा त्रास होतो.

गणोशोत्सवाचा आज शेवटचा दिवस आहे त्यामुळे पुण्यामध्ये विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होते. य गर्दीमध्ये लहान लेकरांचे हाल होण्यापेक्षा त्यांना घरीच राहू द्या.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune ganpati darshan devotees flood streets safety concerns rise as kids struggle in crowd video viral snk