Gautami Patil Dance Video: सबसे कातील गौतमी पाटील हे वाक्य तुम्ही हमखास ऐकलं असणार. कारण ते नाव सध्या अवघ्या महाराष्ट्रभर पसरल आहे. ती नेहमी कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असते. कधी तिच्या कार्यक्रमामुळे तर कधी तिच्यावर कोणी केलेल्या वक्तव्यामुळे. गौतमीचे अनेक व्हिडिओही सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. तिचे कार्यक्रमही खुप गाजतात. सध्या पुण्यात गौतमीच्या नावाची चर्चा सुरु आहे. याचं कारण असं की, गौतमी पाटील पहिल्यांदाच क्रिकेटच्या मैदानात थिरकल्याचे पाहायला मिळाले. पुणे जिल्ह्यात तिचा हा कार्यक्रम पार पडला.याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
गौतमीला नेहमी स्टेजवर धुमाकुळ घालताना आपण पाहिलं आहे मात्र क्रिकेटच्या मैदानावरही सध्या तिचीच चर्चा आहे. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथे शिरूर प्रीमियर लिग किक्रेट सामन्यावेळी तिनं मैदानावरच आपली लावणी सादर केली. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पाटलांचा बैलगाडा या गाण्यावर गौतमीने तुफान डान्स केला आहे. गौतमी पाटीलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून त्यावर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. गौतमी पाटील सोशल मीडियावर तिचे वेगवेगळे फोटो शेअर करते. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. काही महिन्यांपू्र्वी नृत्य करताना तिने अश्लील हावभाव केल्यानंतर तिच्यावर चांगलीच टीका झाली होती. त्यानंतर गौतमी पाटीलने जाहीर माफी मागत असा प्रकार पुन्हा होणार नाही असं सांगितलं होतं.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> धुक्यातून वाट काढण्यासाठी ट्रक चालकाचा जीवघेणा प्रयत्न; पुढच्याच क्षणी…थरारक VIDEO व्हायरल
गौतमीला लहानपणापासून नृत्याची आवड होती. ती अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून वर आली आहे. दरम्यान अकलूज लावणी महोत्सवात तिने पहिल्यांदा लावणी केली. आणि तिला तिथे पाचशे रुपये मानधन मिळालं होतं. यानंतर गौतमीने या क्षेत्रात भविष्य घडवायचं ठरवलं. आणि इथूनच गौतमीचा खरा प्रवास सुरु झाला.घरच्या परिस्थितीमुळे आपण नृत्याकडे वळल्याचे गौतमी सांगते. सुरुवातीला ती बॅकडान्सर म्हणून काम करायची. त्यानंतर गौतमीने पुणे आणि कोल्हापूरमध्ये जास्तीत जास्त शो केले. प्रेक्षकांकडून तिला दिवसेंदिवस अधिक प्रेम मिळू लागलं. तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. त्यामुळे गौतमी महाराष्ट्रभर लोकप्रिय झाली.