Pune Girl Dangerous Bike Ride Video: पुण्यातील रस्त्यावर स्टंट करत वेगाने चालवलेली पोर्श कार दोन जीवांवर बेतली हे प्रकरण अजून निवळलं नसताना पुण्यातील रस्त्यावर स्टंटबाजी करत बाईक चालवणाऱ्या एका तरुणीचा व्हिडीओ नव्याने व्हायरल होत आहे. ही तरुणी यमाहाच्या बाईकवर चुकीच्या पद्धतीने बसून गाडी चालवताना दिसत आहे. एकतर तिने दोन्ही पाय एकाच बाजूला करून बाईकची मागची सीट बसण्यासाठी निवडली, अर्थात पुढे कुणी नव्हतं आणि कळस म्हणजे तिने बाईकचे हॅण्डल सुद्धा पकडलेले नाही. बाजूने जाणाऱ्या गाडीवरून कुणीतरी तिची रील शूट करत असणार. साधारण एका मिनिटाच्या या फुटेजमध्ये ती गाण्यावर रील बनवण्यासाठी हे नको ते धाडस विनाकारण करतेय असं दिसून येतं. या तरुणीचे इन्स्टाग्राम हॅण्डल माधवी कुंभार राजे यावर तब्बल १.६ दशलक्ष फॉलोवर्स आहेत.
पुणे पल्सच्या माहितीनुसार, ही तरुणी हडपसर भागात सध्या व्हायरल झालेला व्हिडीओ शूट करत होती. आम्ही तिचे प्रोफाइल तपासले असता सदर व्हिडीओ तिच्या अकाऊंटवरून हटवण्यात आल्याचे दिसून येतेय. पण हा एकमेव आक्षेपार्ह्य व्हिडीओ नसून तिच्या प्रोफाईलवर अनेक असे स्टंटबाजीचे व्हिडीओ आढळतात ज्यामध्ये ती कधी गुलाब घेऊन पोज देताना, गाडी चालवताना हात सोडून पोज देताना, मोबाईलवर बोलत पोज देताना दिसत आहे. यातील एकाही व्हिडीओमध्ये तिने हेल्मेटसुद्धा घातलेले नाही. १६ जूनपर्यंत, वाहतूक पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतल्याबाबत कोणतेही वृत्त नाही.
माधवी कुंभारच्या इन्स्टाग्रामवरील अन्य पोस्ट
आपण जसे की पाहू शकता की तिच्या प्रोफाईलवर अनेक व्हिडीओजमध्ये ती रिकाम्या रस्त्यांवर शूट करताना दिसते पण काही व्हिडीओ असेही आहेत, जिथे रस्त्यावर वर्दळ आहे हे पाहायला मिळतेय, काही वेळा मागून गाड्या येतायत असंही दिसतंय. त्यामुळे निश्चितच हा प्रकार नियमाला धरून किंवा कलेचा भाग म्हणून योग्य आहे असे म्हणता येणार नाही.
हे ही वाचा<< आता काय व्हायचं? मंडपात नवऱ्याने नवरीला किस करताच झाला अनर्थ! अर्धे वऱ्हाडी हॉस्पिटलला गेले, अर्धे थेट.. पाहा Video
उल्लेखनीय बाब म्हणजे याच माधवीच्या इन्स्टाग्रामवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह तसेच पुण्याची माजी महापौर व नवनिर्वाचित खासदार, राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याबरोबर सुद्धा फोटो व व्हिडीओज आहेत.
माधवीच्या फॉलोवर्समध्ये अनेक जण कदाचित तिचे समर्थकच असले तरी या स्टंटबाजीला विरोध करणाऱ्या काही कमेंट्स सुद्धा तिच्या व्हिडीओखाली पाहायला मिळतात. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा लोकांनी पुणे वाहतूक पोलिसांनी टॅग करून तिच्यावर कडक कारवाईची मागणी केली आहे.