Shocking video: स्त्रियांवरील हिंसाचार ही अगदी रोजची बाब होऊन गेली आहे. महिला कुठेच सुरक्षित नसल्याचं चित्र पाहायला मिळतं. अदगी घरातली महिलांवर अत्याचार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पण आता तर महिलांसोबत पुरुष सुद्धा सुरक्षित आहेत का? असा सवाल करणारा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. कारण एका तरुणाला ट्रेनमधून प्रवास करत असताना एका पुरुषानं जबरदस्तीनं किस केलं.याचा व्हिडीओ सध्या व्हायर होत असून व्हिडीओ पाहून तुम्हीही संताप व्यक्त कराल
ही घटना पुणे-हटिया एक्सप्रेसमध्ये घडली आहे. या व्हिडीओमध्ये तरुणानं केलेल्या दाव्या नुसार स्लिपर कोचनं प्रवास करत असताना तो झोपला होता. त्यावेळी एका व्यक्तीनं डब्यातील अंधाराचा फायदा घेत त्याच्या अश्लिल प्रकार स्पर्श केला. आणि मग त्याचं चुंबन घेतलं. हा तरुण निर्मल मिश्रा यांनी दोन व्हिडिओ शेअर करत प्रवासादरम्यान त्याला काय सहन करावे लागले हे सांगितले आहे.
नेमकं काय घडलं?
इंस्टाग्रामवरील पोस्टमध्ये, श्री. मिश्रा यांनी दावा केला आहे की, “छत्तीसगडमधील एका पुरूषाने तो झोपेत असताना त्याचा छळ केला. मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला आणि मी झोपेत असताना माझे चुंबन घेतले,” असे तो पुढे म्हणाला. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुण एका व्यक्तीवर मोठमोठ्यानं ओरडताना दिसत आहे. यावेळी समोरचा व्यक्ती आरोपी “निर्लज्जपणे” कॅमेऱ्याकडे पाहत राहिला, एवढंच नाहीतर यावेळी त्या व्यक्तीची पत्नीही त्याची बाजू घेत त्याचा बचाव करत राहिली. पुढे हा तरुण ओरडत आहे की, “जर माझ्या जागी एक महिला असती तर सर्वजण पुढे आले असते. जर मुलंही ट्रेनमध्ये सुरक्षित नसतील तर आपण महिला सुरक्षित राहतील अशी अपेक्षा कशी करू शकतो?” त्यानंतर व्हिडिओमध्ये हा तरुण त्या पुरूषाला त्याच्या सीटवरून ओढतोय तर त्याची पत्नी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच तिच्या पतीला माफ करण्याची विनंती करताना दिसत आहे.
पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ mainirmalhoon या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ ९ लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला असून अनेकांनी त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका व्यक्तीने म्हटले, “हे खूप दुःखद आहे.हे लोक मुक्तपणे फिरण्यास पात्र नाहीत.” दुसऱ्याने पुढे म्हटले, “कधीकधी गोष्टी स्वतःच्या हातात घेणे महत्वाचे असते.” “एवढा निर्लज्ज माणूस तिथे उभा आहे जणू काही काहीही झाले नाही, पश्चात्ताप झाला नाही तुमच्या हक्कांसाठी उभे राहिल्याबद्दल तुमचे कौतुक,”