Khajina Vihir In Pune : पुणे हे भारतातील एक ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. येथील ऐतिहासिक वास्तू, सांस्कृतिक बाबींमुळे या शहराची एक आगळी वेगळी ओळख आहे. सांस्कृतिक वारसा जपणारे हे शहर पाहण्यास दुरवरून लोकं येतात. येथील शनिवारवाडा, लाल महाल, किल्ले, जुने मंदिरे आवर्जून बघतात. खरं तर बदलत्या काळानुसार पु्णे शहरामध्ये बरेच बदल दिसून आले तरी सुद्धा पुण्याच्या बऱ्याच अशा ऐतिहासिक वास्तू आहे ज्या सध्या अस्तित्वात नाही पण त्याच्याविषयी लोकांना जाणून घ्यायला आवडते. सोशल मीडियावर असे अनेक ऐतिहासिक वास्तूचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.
सध्या असाच एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये पुण्यातील खजिना विहीर दिसत आहे. ही खजिना विहीर सदाशिव पेठमध्ये होती. हा खजिना विहीरचा खूप जूना फोटो आहे. हा फोटो पाहून अनेकांना पुण्याच्या जुन्या गोष्टी पुन्हा आठवतील.
व्हायरल फोटो
या व्हायरल फोटोमध्ये तुम्हाला खजिना विहीर दिसेल. हा खूप जूना फोटा आहे. व्हिडीओमध्ये खजिना विहिरीची इमारत दिसत आहे. या इमारतीपुढे बैलगाडी आणि दोन बैल दिसत आहे. फोटोवर उजव्या बाजूने लिहिलेय, “खजिना विहीर – सदाशिव पेठ १९४२”
pune_is_loveee या एक्स अकाउंटवरून हा फोटो शेअर करण्यात आला असून या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आठवणीतले पुणे : खजिना विहीर , सदाशिव पेठ. तुमच्याकडे पुण्याविषयी काय काय जुन्या आठवणी आहेत कमेंट करून सांगा..”
या व्हिडीओवर काही युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “जुनं ते सोनं” तर एका युजरने लिहिलेय, “खरंच खूपकाही बदलले आहे पु्ण्यात” त्यावर आणखी एका युजरने लिहिलेय. “तरीपण पुण्यावरचे पुणेकरांचे प्रेम अजूनही तसेच आहे.” त्यावर फोटो शेअर करणारा युजर लिहितो, “पुण्यावरचे प्रेम कधीच कमी होणार नाही..”
खजिना विहीर
खजिना विहिर म्हणजे कधी न आटणारी विहीर होय. पु्ण्यातील एसपी कॉलेजजवळ ही खजिना विहीर होती. या खजिना विहीरीचे अत्यंत दुर्मिळ फोटो उपलब्ध आहे.