‘पुणे तिथे काय उणे’ असं पुण्याबाबत नेहमी म्हटलं जातं, याचा प्रत्यय आज आला. पुणे हे जगात प्रसिद्ध शहर आहे. पुणेकर त्यांच्या वैशिष्टपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात. त्यात पुणेकरांच्या पुणेरी पाट्या ह्या नेहमी चर्चेच्या विषय ठरतात. पुणेरी किस्से आणि पुणेरी पाट्या जगजाहीर आहेत. पुणेकर, पुणेकारांच्या गोष्टी, त्यांनी केलेले अपमान, त्यांच्या भन्नाट करामती आणि त्यासोबतच त्यांनी केलेले कौतुकास्पद आणि धैर्यवान कार्य याचे किस्से आपण कायमच ऐकतो. पुणेकरांनाचं असल्या भन्नाट कल्पना सुचू शकतात, असंही अनेकजण म्हणतात. मात्र हे तितकंच खरं देखील आहे. पुणेकरांच्या अनेक करामतींची राज्यभर चर्चा होते. अशाच एका करामतीची चर्चा सध्या समोर आली आहे. पुण्यातल्या एका हॉटेलचं मेन्यू कार्ड सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, हे पाहून तुम्ही म्हणाल ऐवढा कॉन्फिडन्स येतो तरी कठून…हे मेन्यू कार्ड पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल.

हा फोटो एका हॉटेलमधला असून या हॉटेलमधलं मेन्यू कार्ड सध्या जोरदार व्हायरल होतंय. सगळीकडे या हॉटेलच्या मेन्यू कार्डची चर्चा रंगली आहे. हॉटेलच्या मेन्यू कार्डमध्ये सहसा सर्व मेन्यूची लिस्ट असते. सर्व मेन्यू त्यामध्ये ग्राहकांसाठी दिलेले असतात. दरम्यान पुण्याच्या या हॉटेलमधलं मेन्यू कार्ड वाचून तुम्हीही डोक्याला हात लावाल.आता तुम्ही म्हणाल मेन्यू कार्डमध्ये असं लिहलंय तरी काय?’

Shopkeeper display puneri pati on borrow photo viral on social media funny puneri pati
PHOTO: पुणेकरांचा विषयच हार्ड! उधारी बंद ठेवण्यासाठी दुकान मालकानं सांगितली भन्नाट कारणं; पुणेरी पाटी पाहून पोट धरुन हसाल
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Puneri pati viral only punekars know how to make and deal with them
“आमच्या मुलाचे लग्न…” पुण्यात मुलाला स्थळ आणणाऱ्यांसाठी पालकांनी घराबाहेर लावली भन्नाट पाटी; वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल
Accident Viral Video
प्रत्येकवेळी नशीब साथ नाही देत मित्रा; भर वेगात चार कार आमने-सामने; VIDEO पाहून सांगा चूक नक्की कुणाची?
heartwarming video | a Pune rickshaw driver
“…नंतर पैसे द्या” पुण्यातील रिक्षाचालकाने दाखवला मोठेपणा; Video होतोय व्हायरल
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Heart touching video of police who help poor man on road video goes viral
“शेवटी हिशोब कर्माचा होतो” पोलिसानं गरीब रिक्षा चालकाबरोबर काय केलं पाहा; VIDEO बघून डोळ्यांत येईल पाणी
Pune Video
Pune Video : “पुण्यासारखं सुख कुठेच नाही!” एकदा हा व्हायरल व्हिडीओ पाहाच

टाईमपास करणाऱ्या ग्राहकासांठी जबरदस्त मेन्यू

तर या मेन्यू कार्डवर हॉटेलमध्ये येऊन टाईमपास करणाऱ्यांसाठी वेगळा असा मेन्यू दिला आहे. या मेन्यूतून टाईमपास करणाऱ्यांना पुणेकर हॉटेल मालकानं चांगलाच टोला लगावला आहे. या मेन्यूकार्डवर सुरुवातीला मोठ्या अक्षरात स्पेशल क्वालिटी मेनू असं लिहलं आहे. त्यानंतर पहिला मेन्यू आहे, “काहीच नको ३० रुपये, फक्त पाणी पिणे २० रुपये, पेपर नॅपकिन वाया घालविणे २० रुपये, वाट पाहत टाईमपास करणे ५० रुपये(तास), बडीशेप खिशात भरून नेणे २० रुपये, मेनूकार्ड वाचून निघूण जाणे २० रुपये.” हे मेन्यू कार्ड वाचून लोकं या हॉटेलमध्ये येताना दहा वेळा विचार करतील एवढं नक्की.

पाहा पुणेरी मेन्यू कार्ड

हेही वाचा >> “एक चूक आई-वडिलांना कायमचं दु:ख देऊन जाईल” रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; तरुणाच्या मृत्यूचा VIDEO पाहून थरकाप उडेल

कमीत कमी शब्दांत समोरच्याचा जास्तीत जास्त अपमान करण्याची कला पुणेकरांनाच साधली आहे, असे म्हणतात. त्याचप्रमाणे कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त खवचट आशय व्यक्त करणारी पुणेरी पाटीही कोणी येरा गबाळा बनवू शकत नाही.पुणेरी पाटय़ा म्हणजे पुणेकरांसाठी अभिमानाचा वारसा. केवळ बुद्धिमत्ता नाही तर खास पुणेरी तैलबुद्धीतून पाटय़ांच्या माध्यमातून पुणेकरांचा स्पष्टवक्तेपणा आणि थेट भिडण्याची वृत्ती झळकते.

Story img Loader