‘पुणे तिथे काय उणे’ असं पुण्याबाबत नेहमी म्हटलं जातं, याचा प्रत्यय आज आला. पुणे हे जगात प्रसिद्ध शहर आहे. पुणेकर त्यांच्या वैशिष्टपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात. त्यात पुणेकरांच्या पुणेरी पाट्या ह्या नेहमी चर्चेच्या विषय ठरतात. पुणेरी किस्से आणि पुणेरी पाट्या जगजाहीर आहेत. पुणेकर, पुणेकारांच्या गोष्टी, त्यांनी केलेले अपमान, त्यांच्या भन्नाट करामती आणि त्यासोबतच त्यांनी केलेले कौतुकास्पद आणि धैर्यवान कार्य याचे किस्से आपण कायमच ऐकतो. पुणेकरांनाचं असल्या भन्नाट कल्पना सुचू शकतात, असंही अनेकजण म्हणतात. मात्र हे तितकंच खरं देखील आहे. पुणेकरांच्या अनेक करामतींची राज्यभर चर्चा होते. अशाच एका करामतीचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे, हा व्हिडीओ पाहून तुम्ही म्हणाल ऐवढा कॉन्फिडन्स येतो तरी कठून…व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हॉटेलच्या मेन्यू कार्डवर महिलांसाठी सूचना

हा व्हिडीओ एका हॉटेलमधला असून या हॉटेलमधलं मेन्यू कार्ड सध्या जोरदार व्हायरल होतंय. सगळीकडे या हॉटेलच्या मेन्यू कार्डची चर्चा रंगली आहे. हॉटेलच्या मेन्यू कार्डमध्ये सहसा सर्व मेन्यूची लिस्ट असते. सर्व मेन्यू त्यामध्ये ग्राहकांसाठी दिलेले असतात. दरम्यान पुण्याच्या या हॉटेलमधल्या मेन्यू कार्डमध्ये ग्राहकांसाठी सूचना लिहली आहे, ही सूचना वाचून तुम्हालाही हसू अनावर होईल. एका तरुणीनं या मेन्यू कार्डचा व्हिडीओ शूट करुन सोशल मीडियावर अपलोड केला अन् तो तुफान व्हायरल झाला. आता तुम्ही म्हणाल अशी काय सूचना आहे?

“पुणेकरांना एवढा कॉन्फिडन्स येतो तरी कठून?”

तर या मेन्यू कार्डमध्ये मेन्यूच्या शेवटी “कॅशीअरसोबत फ्लर्ट करु नये” अशी सूचना लिहली आहे. बरं इथपर्यंत ठिक आहे मात्र या कॅशीअरला बघून तुम्हाला खरा शॉक बसेल. कारण हा कॅशीअर म्हणजे कुणी तरुण नाही तर चक्क आजोबांच्या वयाचे व्यक्ती आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, कॅश काऊंटरला एक आजोबा बसले आहेत. आता तुम्हीच सांगा एवढा कॉन्फिडन्स येतो तरी कुठून?

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> नवऱ्यानं बायकोसाठी कारच्या मागे लिहला खास मेसेज; रस्त्यावर सर्व बघतच राहिले, VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक

कमीत कमी शब्दांत समोरच्याचा जास्तीत जास्त अपमान करण्याची कला पुणेकरांनाच साधली आहे, असे म्हणतात. त्याचप्रमाणे कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त खवचट आशय व्यक्त करणारी पुणेरी पाटीही कोणी येरा गबाळा बनवू शकत नाही.पुणेरी पाटय़ा म्हणजे पुणेकरांसाठी अभिमानाचा वारसा. केवळ बुद्धिमत्ता नाही तर खास पुणेरी तैलबुद्धीतून पाटय़ांच्या माध्यमातून पुणेकरांचा स्पष्टवक्तेपणा आणि थेट भिडण्याची वृत्ती झळकते.