IT Engineer Attacked Pune News : पुण्यात नुकतीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्रीच्या काळोखात ४० लोकांच्या टोळक्याने एका कुटुंबाचा रॉड, दगड अन् काठ्या घेऊन पाठलाग केल्याचा थरारक प्रकार घडला आहे. पुण्यातील सुसगाव येथे राहणारे आयटी अभियंता रवी कर्नानी यांनी दावा केला आहे की,”२९ सप्टेंबर रोजी लवळे-नांदे रोडवरून प्रवास करत असताना सुमारे ४० लोकांच्या जमावाने त्यांच्यावर आणि त्याच्या कुटुंबावर हल्ला केला होता. कर्नानी यांनी या घटनेचा एक व्हिडिओ एक्सवर शेअर केला आहे सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दरम्यान रात्रीच्यावेळी नागरिकांच्या सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

थरारक हल्ल्याचा व्हिडीओ व्हायरल

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते की, “एक कार भरधाव वेगाने रस्त्याने जात आहे, दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे असलेले काही तरुण हातात रॉड आणि काठ्या घेऊन जोरात रस्त्यावर मारत होते. त्यानंतर दुचाकीवर दोन जण हातात रॉड घेऊन गाडीवर मारण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. त्यानंतर एका ठिकाणी उभ्या असलेल्या टोळीने गाडीवर दगडफेक देखील केली. या सर्व प्रकारामुळे कारमधील कुटुंब घाबरल्यामुळे ओरडताना ऐकू येत आहे. श्री स्वामी समर्थ’ बोलत कारमधील लोकांची जीव वाचवण्यासाठी विणवनी सुरु होती.

“X” या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलेला कर्नानीचा व्हिडिओमध्ये त्यांनी आपल्या कारचे किती नुकसान झाले हे दाखवले आहे आणि लाठ्या, रॉड आणि दगडांनी सज्ज असलेल्या जमावाने केलेल्या हल्ल्याची माहिती दिली आहे. कर्नानी यांच्या म्हणण्यानुसार, एका गटाने त्यांचा भरधाव वेगाने पाठलाग केला आणि त्यांचे वाहन जबरदस्तीने थांबवण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा –गरुडाची तीक्ष्ण नजर पाहून आनंद महिंद्रा यांना मिळाली प्रेरणा! Video शेअर करत म्हणाले, “लक्ष्य….”

कर्नानी म्हणाले की, “हा हल्ला एका स्थानिक टोळीने घडवून आणला होता. ही टोळी अनेकदा स्थानिक नोंदणी प्लेट नसलेल्या वाहनांना लक्ष्य करते. त्यांनी पुढे आरोप केला की,”गंभीर परिस्थिती असूनही, या भागात गस्त घालणाऱ्या स्थानिक पोलिसांनी हस्तक्षेप केला नाही आणि त्याऐवजी हल्लेखोरांना पाठिंबा दिल्याचे दिसते.”

हेही वाचा –Video : चूक कोणाची? कामाचे तास संपल्याने पायटलचा टेक ऑफसाठी नकार! पुणे-बंगळुरू इंडिगो फ्लाइला ५ तास उशीर; प्रवाशांचे हाल

कर्नानी आपल्या कुटुंबासह कारमधून जात असताना ही घटना घडली. ते लवळे-नांदे रस्त्यावरून जात असताना मोटारसायकलने आलेल्या दोघांनी कारचा पाठलाग करून त्यांचा मार्ग अडवण्याचा प्रयत्न केला. तसेच रस्त्यावर उभ्या असलेल्या टोळक्यांनी कारवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत कर्नानी यांच्या कारचे मोठे नुकसान झाले आणि या घटनेमुळे कर्नानी आणि त्यांच्या कुटुंबाच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला होता.

या तक्रारीवरून पौड पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अधिकारी आता हल्ल्याबाबत शोध घेत आहेत आणि पुढील कारवाई करणे अपेक्षित आहे. या घटनेने सोशल मीडियावर लक्ष वेधून घेतले आहे ज्यामुळे परिसरातील कायदा आणि सुव्यवस्थेबद्दलची चिंता आणि स्थानिक पोलिसांच्या कथित निष्क्रियतेवर प्रकाश टाकला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune it engineer and family attacked by mob on lavale nande road crime news video viral snk