Recycling Of Plastic Wrappers: आपल्या रोजच्या जीवनात प्लास्टिकच्या वस्तू वापरण्याचे प्रमाण किती आहे याचा आपण कधीच विचार करत नाही, कारण आपल्या जीवनशैलीत आता या गोष्टी अविभाज्य झाल्या आहेत नाही का? पण विचार करा की वापर झाल्यावर यापैकी किती गोष्टी आपण पुन्हा वापर करण्यासाठी ठेवून देतो किंवा भंगारवाल्याला विकतो, फारच थोड्या गोष्टी आपण जपून ठेवतो किंवा भंगारवाल्याला विकतो, बहुतांश वस्तू आपण कचऱ्यात फेकून देतो. त्याचा परिणाम पर्यावरणाच्या प्रदुषणावर होतो. पण आता समाज बदलतो आहे. पर्यावरणाच्या हानीचा विचार लोक करू लागले आहेत, त्यातूनच या टाकाऊ प्लास्टिक पासून पुन्हा वापर करता येईल असे काय करता येईल ज्यातून त्याचे होणारे प्रदुषण टाळता येईल हा विचार करण्यात आला आणि पुणेकर महिलांनी चिप्सच्या पाकिटांपासून पिशवी बनवण्यास सुरूवात केली. आहे ना, इंटरेस्टिंग! याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा