काही दिवसांपूर्वी पुण्यात मुळा मुठा नदीच्या परिसरात डासांचे वादळ घोंगवताना दिसले होते. सोशल मीडियावर या घटनेचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. ज्यामुळे मुळा-मुठा नद्यांची स्वच्छता आणि पुणेकरांच्या आरोग्याबाबत प्रश्न उपस्थित झाला होता. या घटनेला एक आठवडा देखील झाला नाही तोच आता नवीन व्हिडीओ समोर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुण्यातील हिंजवडी येथील एका रहिवाशाने धक्कादायक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये त्याने दावा केला की, त्याला त्याच्या वॉटर प्युरिफायरच्या फिल्टर कँडलमध्ये लाल अळ्या सापडल्या आहेत. त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर शेअर केला जयदीप बाफना नावाच्या एक्स या अकांऊटवरून हा व्हिडीओ १५ फेब्रुवारी रोजी शेअर करण्यात आला त्यानंतर हा व्हिडीओ चर्चेत आला. व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे.

जयदीपच्या मते, लाल अळ्या ‘चिरोनोमिड लार्व्हा'(Chironomid larvae) म्हणून ओळखल्या जातात. त्यांना सामान्यतः पुर्ण वाढलेल्या अवस्थेत त्यांना ‘नॉन-बिटिंग मिडजेस’ (non-biting midges) आणि अळ्यांच्या अवस्थेत ‘ब्लडवर्म्स'(bloodworms’) असे संबोधले जाते.

ही घटना हिंजवडीतील ब्लू रिज टाऊनशिपमध्ये घडल्याचे जयदीपने आपल्या पोस्टमध्ये सांगितले आहे. “जर हे वाकड आणि हिंजवडीपर्यंत पोहोचले असतील तर याचा अर्थ नदी हळूहळू प्रतिकार करण्याची क्षमता गमावत आहे. हा प्रश्न काही घरांच्या नळापुरता मर्यादित नाही. टाऊनशिपमधील ८०० फ्लॅटपैकी अंदाजे २० टक्के फ्लॅट्समध्ये या लाल रंगाच्या अळ्या आढळल्या आहेत, जे पाण्याची खराब गुणवत्ता दर्शवितात.

जयदीपने त्याच्या पोस्टमध्ये इतर पर्यावरणीय समस्यांबद्दल देखील सांगितले आणि महापालिका अधिकाऱ्यांनी त्वरित याकडे लक्ष देणे आवश्यक आहे असे सांगितले.

हेही वाचा – पुण्यात मुठा नदीवर घोंगावताना दिसले डासांचे वादळ; VIDEO पाहून नागरिक धास्तावले

हेही वाचा – “मी मोसंबी, मी नारंगी”, गुरु शिष्याच्या जोडीने सादर केली ठसकेबाज लावणी; Viral Video एकदा बघाच

पोस्टला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांनी पोस्टच्या कमेंट विभागात त्यांच्या चिंता व्यक्त केल्या आहेत.

“सामान्य माणसाचा, पण एक प्रामाणिक प्रश्न. लोकांना थेट नदीतून पाणी मिळते का? मला वाटले की त्यांना ते धरणातून मिळते, त्यावर प्रक्रिया केल्यावर. मग या समस्येचा नेमका स्रोत काय आहे?नदी धरणातील की पाण्याच्या पाइपलाइन” असे एका व्यक्तीने विचारले. ..

“हे खूप गंभीर आहे आणि आरोग्यासाठी एक मोठी चिंता आहे,” दुसऱ्या वापरकर्त्याने सांगितले.

हेही वाचा – मध्यप्रदेशात दिसला थ्री इडियट्समधील रँचो? बेशुद्ध आजोबांना बाईकवर घेऊन थेट हॉस्पिटलमध्ये शिरला तरुण

“निसर्ग आधीच नष्ट झाला आहे. पिढ्यानपिढ्या शेतीसाठी जागा निर्माण करण्यासाठी आपण प्रत्येक झाड तोडले आहे. गंमत म्हणजे फक्त शहरे उरली आहेत. फक्त Google Earth चालू करा आणि भारताकडे पहा, आपण शेतीसाठी जे काही वापरू शकतो ते नष्ट केले आहे,” असे तिसऱ्याने सांगितले.

इंटरनेटवर अनेकानी संबंधित अधिकाऱ्यांना सांडपाणी प्रक्रिया, ड्रेनेज आणि कचरा व्यवस्थापन यासारख्या गंभीर समस्यांवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune man finds red larvae inside water purifier shares video pollution of mula river leads to presence of bloodworms in drinking water residents alarmed snk