Viral Gym Review : आजकाल लोक फिटनेसबाबत खूप जागरुक असल्याचे दिसतात. यात जिमला जाणं हा अनेकांच्या डेली रुटीनचा एक भाग बनला आहे. हल्ली अनेक कपल देखील एकत्र जिममध्ये जाताना दिसतात. जिममध्ये एकत्र वर्कआऊट करतात. यामुळे हल्ली जीम ओनर आणि ट्रेनर देखील खास कपलसाठी स्पेशल वर्कआउट पॅकेज तयार करतात. अशाप्रकारे पुण्यातील एक तरुणाने त्याच्या गर्लफ्रेंडबरोबर जिमला जाणं सुरु केलं. पण यानंतर त्याच्यावर पश्चाताप करण्याची वेळ आली. याबाबत त्याने थेट जिमच्या गुगल रिव्ह्यू बॉक्समध्येच खुलासा केला आहे, जे वाचल्यानंतर तुम्ही देखील पोट धरुन हसाल. नेमकं या तरुणाबरोबर काय घडलं जाणून घेऊ…
गर्लफ्रेंडला आवडू लागला दुसरा मुलगा
पुण्यातील एक तरुण फिटनेससाठी आपल्या गर्लफ्रेंडबरोबर रोज जिमला जात होता, मात्र जिमच्या नादात त्याला एक दिवस गर्लफ्रेंडलाच गमवावे लागले. याबाबत त्याने चक्क गुगलवर जिमच्या रिव्ह्यू बॉक्समध्ये खुलासा केला. त्याने रिव्ह्यूमध्ये असे काही लिहिले आहे की, ते आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
सोहम नावाच्या एका युजरने जिम रिव्ह्यूबॉक्सचा स्क्रिनशॉर्ट एक्सवर शेअर केला आहे. स्क्रीनशॉटमध्ये त्या तरुणाने लिहिलेले स्पष्टपणे वाचता येतेय. त्याने लिहिले आहे की, “मी काही महिन्यांपूर्वी माझ्या गर्लफ्रेंडबरोबर जिमला जाणं सुरु केलं. ती जागा चांगली आहे, लोकही छान आहेत, पण या जिमला मी १ स्टार देत आहे, कारण माझी गर्लफ्रेंड श्रुतीने ‘अभिषेक’ नावाच्या तरुणासाठी मला धोका दिला”.
PHOTO : तरुणाने बनवला कामवाल्या बाईचा असा CV की, पाहताच लोकांनी दिल्या कामाच्या अनेक ऑफर्स
त्या तरुणाने रिव्ह्यूमध्ये पुढे लिहिलेय की, “सुरुवातीला, मला वाटले की, दोघांमध्ये फक्त मैत्री आहे, पण मला माहित नव्हते की, तो तिला माझ्यापासून दूर करत आहे. मी अभिषेकबरोबर अनेक प्रोटीन शेकर शेअर केलं. पण त्याने माझी फसवणूक केली. आता ते एकत्र वर्कआऊट करतात आणि मी आता एकटा राहिलो आहे.”
हेही वाचा – पीएफमधून पैसे काढण्यात अडचण, व्यावसायिकाने केला सोशल मीडियावर संताप व्यक्त; ईपीएफओ दिले ‘असे’ उत्तर
तरुणाच्या पोस्टवर लोकांच्या मजेशीर कमेंट्स
एक्सवर ही मजेशीर पोस्ट लोकांचे लक्ष वेधून घेत आहेय पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये लोकांनी एकापेक्षा एक मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका व्यक्तीने कमेंटमध्ये लिहिलेय की, “मी माझ्या गर्लफ्रेंडबरोबर जिममध्ये जाण्याचा विचार करत होतो, हे वाचून माझ्या काळजात धस्स झाले.”दुसऱ्याने लिहिले, “प्रोटीन शेकची गोष्ट तर भावा, माझ्या काळजाला भिडली.” शेवटी एकाने लिहिले की, “जिमच्या रिव्हू बॉक्समध्ये नेहमीच काहीतरी मजेशीर गोष्टी वाचायला मिळतात”.