पुण्यातील एका व्यक्तीने गुगलवर जिमसाठी फक्त वन-स्टार रेटिंग दिली आहे कारण जीम मेंबरबरोबर संबध ठेवून त्याच्या प्रेसयीने त्याला फसवले. पुणेकराने असा दावा केला आहे की, आपल्या गर्लफ्रेंडसह तो पुण्यातील कल्याणीनगर येथील कल्ट जीममध्ये वर्क आऊट करत असे. पण जीममधील दुसऱ्या मेंबरने ब्रो-कोड मोडला आणि त्याची गर्लफ्रेंडला त्याच्यापासून दूर केले. पुणेरी व्यक्तीने असेही सांगितले की त्याने त्याचा प्रोटीन शेकही त्याच्याबरोबर शेअर केला होता एवढी त्यांची मैत्री होती. या रिव्ह्यूचा स्क्रिनशॉट तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी ही पोस्ट वाचून कमेंट केल्या आहेत.
आता व्हायरल झालेल्या रिव्ह्यूमध्ये पुणेरी व्यक्तीने सांगितले, “मी काही महिन्यांपूर्वी माझ्या गर्लफ्रेंडबरोबर जीम क्लबमध्ये सहभागी झालो होतो. हे ठिकाण छान आहे, येथील लोक चांगले आहे पण तरीही मी जीमला वन-स्टार रेटिंग दिले कारण कारण माझी गर्लफ्रें श्रुतीने जीममध्ये’अभिषेक’ नावाच्या एका व्यक्तीबरोबर संबध ठेवून माझी फसवणूक केली.”
त्या पुणेरी व्यक्तीने सांगितले की,” सुरुवातीला मला वाटले की ते दोघे फक्त मित्र आहेत, परंतु शेवटी गोष्टी गंभीर झाल्या. “मी माझा प्रोटीन शेक अभिषेकबरोबर शेअर केला पण त्याने माझा विश्वासघात केला. आता, ते एकत्र कसरत करतात आणि मी एकटा आहे.”
u
येथे पाहा Post
https://twitter.com/king26_sk/status/1862098012820144510/
हेही वाचा –” वाईनच्या बाटल्या फेकल्या, वस्तू फेकल्या…मॉलमध्ये बेशिस्त चिमुकलीचा राडा!Viral Video पाहून तिच्या आई-वडीलांवर संतापले नेटकरी
स्क्रिनशॉट पाहून अनेकांनी कमेंट केल्या.
एका व्यक्तीने खिल्ली उडवली, “या जिमने त्याच्यासाठी ‘वर्क-आउट’ केले नाही.”
तुमच्या प्रोटीनवर कोणाबरोबरही शेअर करणे हा वेडेपणा आहे,” आणखी एकाने म्हटले
तिसऱ्याने कमेट केली केली, “मी ऐकले आहे की प्रथिने शेअर करणारे जिम ब्रो कोणत्याही टॅगशिवाय कायमचे मित्र असतात.”
“भाऊ प्रोटीन शेकबद्दल कि त्याच्या मैत्रिणीबद्दल जास्त दु:खी आहे हे सांगू शकत नाही,” असे चौथ्याने विनोद केला.