Pune market viral video: हल्ली आपल्या सर्वांची जीवनशैली खूप धावपळीची बनली आहे. तरीही आपण सर्वजण वेगवेगळ्या प्रकारे स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करतो. यामुळेच लोक फिट राहण्यासाठी खाण्यापिण्याची विशेष काळजी घेतात. सध्याच्या जीवनशैलीमुळं लोकांकडे वेळ कमी असतो. त्यामुळं लोक ऑनलाइन वस्तू ऑर्डर करू लागले आहेत. यामध्ये आता खाण्या पिण्याच्या वस्तूंचाही समावेश होऊ लागला आहे. तुम्हीही फळ भाज्या ऑनलाईन मागवत असाल तर समोर आलेला व्हिडीओ पाहून धक्का बसेल. तुम्ही बाजारातून भाजी किंवा फळं आणायला गेलात तर, अनेकदा काय ताजं आहे आणि काय लवकर खराब होण्याची शक्यता आहे, हे लक्षात येतं. तसेच समोर किती स्वच्छता आहे हे सुद्धा दिसतं.तसेच जेव्हा आपण फळे भाज्या विकत घेतो तेव्हा ती वरुन ताजी दिसत आहेत का हे पाहतो. तुम्हीही असंच करत असाल तर थांबा कारण आता ताजी दिसणारी सगळीच फळं तुमच्या आरोग्यासाठी योग्य असतीलच असं नाही. पुण्यातील एक धक्कादायक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल.

पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्ड परिसरात फळांमध्ये भेसळ केल्याचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कचऱ्यामध्ये टाकून दिलेली फळे गोळा करुन पुन्हा त्याची विक्री केली जात होती. यावेळी टाकून दिलेली मोसंबी पाण्यात धुतली जात आहे आणि नंतर बाजारात विकली जात आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या प्रक्रियेनंतर, मोसंबीला एक आश्चर्यकारक सोनेरी चमक येते, ज्यामुळे ती ताजी आणि आकर्षक दिसते. नैसर्गिक पद्धतीने फळे पिकण्यासाठी जास्त कालावधी लागतो. त्यामुळे फळे लवकर पिकावी, यासाठी फळ विक्रेत्यांकडून विविध प्रकारच्या रसायनांचा वापर होत असल्याचे आढळत आहे. पर्यायाने, सेंद्रिय घटक नष्ट होऊन रासायनिक घटकांची भेसळ वाढल्याने ही फळे आरोग्यासाठी घातक ठरू शकतात.

या घटनेची दुसरी धक्कादायक बाजू म्हणजे हे काम अवघ्या ११ ते १२ वर्षांच्या लहान मुलांकडून केले जात आहे. त्यांची दुर्दशा सहानुभूती निर्माण करू शकते, परंतु खरी चिंता म्हणजे अशा अस्वच्छ पद्धतींमुळे निर्माण होणारा गंभीर आरोग्य धोका. रासायनिक प्रक्रिया किंवा दूषित पाण्याच्या संपर्कामुळे ही फळे खाण्यासाठी धोकादायक ठरू शकतात.

पाहा व्हिडीओ

फळे खरेदी करताना सावधगिरी बाळगा! आरोग्य तज्ञांनी ग्राहकांना बाजारातून फळे खरेदी करताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. बाहेरुन जरी फळे ताजी दिसत असली तरी खरेदी करण्यापूर्वी स्त्रोत आणि स्वच्छता तपासणे आवश्यक आहे.