पुणे आणि पुणेकरांची चर्चा जगभर होत असते. पुणेकरांचा मजेशीर स्वभाव आणि पुणेरी पाट्या नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेतात. पुणेकरांच्या स्पष्टवक्तेपणामुळे त्यांच्या नादाला कोणी लागत नाही. पुणेकर कधी काय करतील याचा नेम नाही. फक्त पुणेकरच पुण्याच्या मेट्रोमध्ये रेल्वे प्रवासाचा अनुभव देऊ शकतात. विश्वास बसत नसेल तर व्हायरल व्हिडिओ पाहा. व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणेकरांचा नादखुळा

पुण्यात कधी काय होईल सांगता येत नाही. पुणे मेट्रो ही अत्याधुनिक आहे. प्रत्येक १० मिनिटांनी मेट्रो धावते. मेट्रोमध्ये एसीची सुविधा आहे. सरकते जिने आणि लिफ्टची सोय देखील केली आहे. बसून किंवा उभे राहून आरामात प्रवास करता येईल अशी ऐसपैस जागा आहे. इथे रेल्वे प्रवासासारखी खच्चा खच्ची गर्दी नाही की धक्का बुक्की नाही. अत्यंत शिस्तीने प्रवास पार पाडतो. मेट्रो प्रवासा दरम्यान येणाऱ्या प्रत्येक स्टेशन माहिती दरवाज्याच्यावरील स्क्रिनवर दिसते. एवढं स्टेशन येताच रेकॉर्डेड आवाजामध्ये स्टेशनचे नाव ऐकू येते. पण काही लोकांना शांततेतील मेट्रो प्रवासा नकोसा वाटत असावा म्हणूनच की मेट्रोमध्ये रेल्वे प्रवासाची अनुभती घेण्याचा प्रयत्न करत आहे.

Viral Video येथे पाहा

नक्की काय घडले?

व्हायरल व्हिडिओमध्ये पाहू शकता की, प्रथम काही तरुण स्टेशन जवळ येताच ऐकू येणार्‍या रेकॉर्डेड आवाजाची नक्कल करताना दिसतात. “पुढचे स्टेशन जिल्हा न्यायालय, उतरताना डाव्या बाजूने उतरा” असे म्हणताना ऐकू येते. पुढच्याक्षणी हे तरुण रेल्वेत फिरणाऱ्या विक्रेत्यांप्रमाणे आवाज काढत म्हणतात, “जेली, चॉकलेट, लेमनगोळी, ओली भेळ, पाणी बॉटल आहे, लोणवळा चिक्की, १०० ला चार आहे” एवढं बोलून तरूण मेट्रोतून बाहेर पडतात. त्यांच्या बरोबर असलेले तरुणांना हसू येत. प्रवासी देखील त्यांच्याकडे आश्चर्याने पाहात राहतात.

व्हिडिओ मजेशीर असून नेटक्यांना प्रचंड आवडला आहे. व्हिडीओ इंस्टाग्रामवर punerikataa नावाच्या पेजवर पोस्ट केला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “पोरांनी तर नादच केला. पुण्यात नमुन्यांची कमी नाही”

पुणेकर काय म्हणाले?

व्हिडिओवर कमेंट करताना एकाने लिहिले की, अहो, आमच्या पुणेकरांना नमुने बोलता होय? नुमने नाही बोलत याला प्रत्येक क्षणी जगण्याची मज्जा घेतो आम्ही पुणेकर, टेन्शन नाही घेत राव! म्हणूनच तर बोलतात पुणे तिथे काय उणे, माझे पुण्यावर प्रेम आहे”

दुसऱ्याने कमेंट केली, “पुणेकरांचा जगण्याचा हटके अंदाज आहे. स्वत:ही खूष राहतात आणि स्वत:बरोबर दुसऱ्यांना ही खुष ठेवतात.”