Pune Metro Viral Video: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्याचे उद्घाटन झाले. पुणे मेट्रोचा पहिला टप्पा गरवारे कॉलेज ते वनाज यादरम्यान असून दुसऱ्या टप्प्यामधील दोन मार्गिका आजपासून पुणेकरांना सेवा देताना पाहायला मिळणार आहेत. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटनासाठी पुण्यात दाखल झाल्याने पुणे मेट्रोची राज्यभर चर्चा झाली होती. आणि आता याच पुणे मेट्रोमधील एका अस्सल पुणेकर काकांचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. पुणे मेट्रोच्या प्रवासात एका व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीने प्रवासी काकांना काय मग कसं वाटतंय असा साधा प्रश्न विचारला होता ज्यावर काकांचं उत्तर ऐकून नेटकरी चांगलेच इम्प्रेस झाले आहेत.
तुम्ही व्हिडीओमध्ये ऐकू शकता की एक व्यक्ती पुणेकर काकांना, मेट्रोमध्ये बसून कसं वाटतंय असे विचारते. ज्यावर काका फक्त चार शब्दात एकदम परफेक्ट पण मजेशीर उत्तर देतात. त्यांचं उत्तर व ते देतानाचा चेहऱ्यावरचा सहजपणा नेटकऱ्यांना आवडत आहे. तसेच यावर अनेकांनी मजेशीर कमेंट करून पुण्यात एखाद्याला विनाकारण प्रश्न विचारायला जाऊ नये असंही म्हटलं आहे. तुम्ही स्वतःच आधी हा व्हिडीओ पहा..
Video: पुणेकरांचा Swag
हे ही वाचा<< मुंबई-गोवा महामार्गाची भीषण अवस्था! युट्युबर जीवन कदमने दाखवलं सत्य, म्हणाला, “गाडीचा टायर भररस्त्यात…”
काकांचा सॅव्हेजपणा नेटवर जरी मीम म्हणून व्हायरल होत असला तरी अनेकांनी यावर कमेंट करत, “काकांच्या बोलण्यात मुद्दा तर आहे” असेही लिहिले आहे. तब्बल १ लाख १४ हजाराहून अधिक लाईक्स असणाऱ्या या व्हिडीओमुळे अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले आहे. प्राप्त माहितीनुसार हा व्हिडीओ मेट्रोच्या पहिल्याच टप्यातील आहे. कारण तुम्ही बघू शकता यामध्ये सर्वांनी चेहऱ्यावर मास्क घातले आहेत. आता मेट्रोच्या दुसऱ्या टप्याचे उद्घाटन होता हा व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल होत आहे.