पुणे हे देशातील ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. येथील ऐतिहासिक वास्तू पुण्याच्या सौंदर्यात भर घालतात. शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखले जाणारे पुणे इतर अनेक गोष्टींसाठी लोकप्रिय आहे. पुण्याची मिसळ असो की पुणेरी पाट्या नेहमी चर्चेत असतात. शनिवारवाडा, नाना वाडा, केळकर म्युझियम, दगडूशेठचा गणपती, पर्वती टेकडी, बाणेर टेकडी, तुळशीबाग, लाल महाल, चतुशृंगी मंदिर असे अनेक ठिकाणे आहेत जे पुण्यात येणाऱ्या प्रत्येकाने बघितले पाहिजे पण फक्त पुण्यातीलच नाही तर पु्ण्याजवळ सुद्धा फिरण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात जे पुण्याजवळ फिरण्यासाठी चांगली चांगली ठिकाणे सुचवित असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये पुण्याजवळ फिरण्यासाठी सर्वात चांगली पाच ठिकाणे सांगितली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हायरल व्हिडीओमध्ये सांगितल्याप्रमाणे ती पाच ठिकाणे आहेत.
१. सिंहगड किल्ला
२.पवना तलाव
३.लोणावळा
४. राजगड किल्ला
५. खडकवासला धरण

तुम्ही जर या पाच ठिकाणांपैकी एकही ठिकाण बघितले नसेल तर नक्की बघू शकता.
सिंहगड किल्ला हा पुणे शहरापासून फक्त ३०-२५ कि.मी अंतरावर आहे. ही पुण्यातील ऐतिहासिक आणि प्राचीन वास्तू आहे.
पवना तलाव हे पुण्यापासून ५० किमी अंतरावर आहे. वनडे ट्रिपसाठी हे बेस्ट ठिकाण आहे. या तलावाजवळ कॅम्पिंगची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे.
लोणावळा हे पुण्यापासून ६५ किमी अंतरावर आहे. तुम्ही पावसाळा आणि हिवाळ्यात लोणावळ्याला भेट देऊ शकता. थंड हवेचे ठिकाण असलेले लोणावळा प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे.
गडांचा राजा आणि राजांचा गड अशी ओळख असलेला राजगड किल्ला हा पुण्यापासून ४८ किमी अंतरावर आहे.हा किल्ल्याला सुद्धा तुम्ही अवश्य भेट देऊ शकता.
पुण्यापासून खडकवासला धरण फक्त २० किमी अंतरावर आहे.खडकवासला धरणातूनच पुणे शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. खडकवासला एक दिवसाच्या सहलीसाठी योग्य पिकनिक स्पॉट आहे.

हेही वाचा : Optical Illusions : तुम्हाला फोटोमध्ये दोन कुत्र्यांसह एक माणूस दिसतोय? पण हा माणूस नाही, एकदा क्लिक करून पाहा

maze.pune या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पुण्याजवळ फिरण्यासाठी ५ बेस्ट ठिकाणे” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मी यापैकी राजगडला जाईल.” तर अनेक युजर्सनी आणखी जवळचे काही चांगली ठिकाणे सुचवली आहे. कोणी ‘आळंदी’ लिहिलेय तर कुणी ‘तोरणा किल्ला’ लिहिलाय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune news 5 best place to visit near pune watch viral video on social media ndj