Viral Video : पुणे हे ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. येथील संस्कृती आणि ऐतिहासिक वास्तूंविषयी आपण बऱ्याचदा ऐकले असेल. पुणेरी भाषा, पुणेरी पाट्या आणि पुण्याची मिसळची चर्चाही ऐकली असेल पण पुण्यात आणखी एक गोष्ट अधिक लोकप्रिय आहे, ती म्हणजे पीएमटी. (Pune Municipal Transport) पीएमटीच्या बसनी तुम्ही कधी प्रवास केला का? (do you ever travel in pmt pune bus)
जर तुम्ही पुण्यात राहत असाल तर पीएमटी बसनी आयुष्यात एकदा तरी प्रवास केला असेल पण तुम्ही जर पुण्यात राहत नाही तर पुण्यात आल्यानंतर एकदा पीएमटीने प्रवास नक्की करा. सध्या पीएमटी बसचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून काही लोकांना त्यांच्या अनेक गोष्टी आठवतील.
जसा लोकल मुंबईकरांच्या काळजाचा विषय आहे तसेच पीएमटी ही पुणेकरांची जीव की प्राण आहे. एक दिवस जर पीएमटी बसेस बंद असेल तर प्रवाशांचे हाल होते. हा व्हायरल व्हिडीओ चालत्या पीएमटी बसचा आहे. बसमध्ये बसून प्रवास करणाऱ्या एका पुणेकर प्रवाशाने हा व्हिडीओ शूट केला आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये नेहमीप्रमाणे खूप गर्दी नाही. व्हिडीओमध्ये तुम्हाला बसचालक बस चालवताना दिसत आहे तर कंडक्टर तिकीट काढताना दिसत आहे. प्रवासी सीटवर बसलेले आहेत. त्यानंतर कंडक्टर एका सीटवर बसून पैसे मोजताना दिसतात.
हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही पीएमटीने केलेला प्रवास आठवेल. पीएमटी बसबरोबर अनेक लोकांच्या अनेक आठवणी जुळलेल्या असतात. विद्यार्थी आणि नोकरी करणाऱ्यांसाठी पीएमटी बसचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या व्हिडीओवर लिहिलेय, “पुणे आणि पीएमटी बस”
हेही वाचा : पुणे तिथे काय उणे! प्रवाशांच्या गर्दीमुळे चक्क मेट्रोही पडली बंद, Video होतोय तुफान Viral
पाहा व्हायरल व्हिडीओ
punekar_sushil या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पुणे आणि PMT चा प्रवास, केला आहे का PMT ने प्रवास ?” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मनसोक्त मोकळा श्वास ” तर एका युजरने लिहिलेय,”खुप छान प्रेमळ माणसं आहेत” तर एका युजरने लिहिलेय, “मी ५० चा पास काढून फिरत असतो दर रविवारी” आणखी एका युजरने लिहिले, “पुणे ची PMT : जुन्या आठवणी….. गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी..” एक युजर लिहितो, “एवढी रिकामी बस, विश्वास बसत नाही…. आमच्या वाघोलीतून तर भरुन निघतातात कधीच जागा नसते”