Viral Video : पुणे हे देशातील ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. सांस्कृतिक जपणारे शहर म्हणून पुण्याची ओळख आहे. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात दरवर्षी हजारो विद्यार्थी येथे शिकायला येतात. सोशल मीडियावरही पुण्याच्या अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. पुण्याचे खाद्यपदार्थ असो की येथील ऐतिहासिक वास्तू, पुण्याच्या पाट्या तर नेहमीच चर्चेचा विषय असतो. पण तुम्ही पुण्यातल्या एका इमारतीविषयी ऐकले आहे का? ही इमारत पडती आहे. होय, या पडती इमारतीचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये पुण्यातील ही पडती इमारत दाखवली आहे. ही खरंच पडती नाही तर या इमारतीचे बांधकाम असे केले आहे की ती आपल्याला पडणार की काय, असा भास होतो.
व्हिडीओत तुम्हाला दिसेल की ही इमारत अतिशय आकर्षक असून कुणाचे लक्ष वेधून घेते. पांढरा आणि निळा रंगामुळे येणाऱ्या जाणाऱ्याचे या इमारतीकडे सहज लक्ष जाते. ही इमारत कॅम्प परिसरात आहे.

The unique friendship of a leopard and a deer
“अशी मैत्री कधी पाहिली नसेल…” बिबट्या आणि हरणाची अनोखी मैत्री; VIDEO पाहून व्हाल थक्क
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
navneet rana daryapur rada
VIDEO : अमरावतीत नवनीत राणांच्या प्रचारसभेत राडा; माजी खासदारावर हल्ल्याचा प्रयत्न!
Muramba
Video: “ज्या हातांनी मंगळसूत्र फेकलंस…”, रमा रेवाला देणार सणसणीत उत्तर; ‘मुरांबा’चा जबरदस्त प्रोमो
marathi actress amruta Deshmukh share brother abhishek Deshmukh funny video
‘आई कुठे काय करते’मधील अभिषेक देशमुखचा बहिणीने शेअर केला मजेशीर व्हिडीओ, म्हणाली, “मालिका संपतेय तर मग…”
celebrated Diwali in America for the first time watch video
Video: भाऊ कदम यांच्या लेकीने पहिल्यांदाच कुटुंबापासून दूर राहून अमेरिकेत ‘अशी’ साजरी केली दिवाळी, पाहा व्हिडीओ
Police found dead body of a boy in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला

हेही वाचा : Video : गँग असावी तर अशी! रेल्वे स्टेशनवर मित्रमैत्रीणींचा बॉलीवूड गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हायरल व्हिडीओ

_amhi.punekar या अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पुण्यातील पडती बिल्डिंग पाहिली का?”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “हो.. ही इमारत कॅम्प परिसरात आहे.” तर एका युजरने लिहिलेय, “लहानपणी आई सोबत बस मधून तिकडे जायची, त्यावेळेस खूप भीती वाटायची पडते का काय…” आणखी एका युजरने लिहिलेय, “अशीच इमारत साताऱ्यात सुद्धा आहे.”