Viral Video : महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाच्या वास्तव्याचे स्थान म्हणजे पंढरपूर. प्रत्येकाला वर्षातून एकदा तरी पंढरपूरला जावे असे वाटते. चंद्रभागेच्या काठावर असलेल्या या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी दर्शनासाठी दरदिवशी हजारो भाविक येतात. पण काही लोकांना इच्छा असूनही पंढरपूरला जाता येत नाही. अशा लोकांसाठी आनंदाची बातमी आहे. हे लोक पुण्याजवळील एका ठिकाणी विठु माऊलीच्या दर्शनासाठी जाऊ शकतात. या ठिकाणाला प्रति पंढरपूर म्हणतात. तुम्ही हे प्रति पंढरपूर पाहिले आहे का? जर नाही तर हा व्हिडीओ नक्की पाहा. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये प्रति पंढरपूरविषयी माहिती सांगितली आहे. nomad.shravani या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एका शिवानी नावाच्या ब्लॉगरनी हा व्हिडीओ शेअर केला असून ती व्हिडीओमध्ये सांगते, “आज मी आलेली आहे पवना डॅमपासून अगदी १० किमी अंतरावर असलेल्या प्रति पंढरपूर येथे. मंदिरामध्ये विठ्ठल रुख्मिनीबरोबर संत ज्ञानेश्वरांचे सुद्धा मंदिर आहे. मंदिराचे बांधकाम एकदम भव्य असून आणि मन आकर्षिक करणारा आहे. मंदिर परिसरातून तुम्हाला लोहगट किल्ला सुद्धा दिसतो. एकदा अवश्य भेट द्यावी, असे हे मंदिर.”
व्हिडीओमध्ये या मंदिराचा सुंदर परिसर दाखवला आहे. या व्हिडीओवर कॅप्शनमध्ये लिहिलेय, “प्रति पंढरपूर मंदिर, पुणे. पुण्यापासून अगदी ५० किमी अंतरावर” कॅप्शनमध्ये या मंदिराचे लोकेशन सुद्धा सांगितले आहे. “दुधीवरी खिंड आपटी,महाराष्ट्र ४१०४०१” ज्या लोकांना पंढरपूरला जायची इच्छा आहे त्यांनी या प्रति पंढरपूरला नक्की भेट द्यावी. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहेत.
पाहा व्हायरल व्हिडीओ
हेही वाचा : दिल्लीत भीषण पाणी टंचाई; टँकर येताच जीव धोक्यात घालून लोकांची धावपळ; VIDEO विचार करायला भाग पाडेल
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आम्ही पंढरपूर चे आहोत. पण हे ठिकाण खूप छान आहे” तर एका युजरने लिहिलेय, “मंदिराजवळचा निसर्ग खूप सुंदर आहे. दुधीवरे खिंड आणि मंदिराजवळच्या डोंगराच्या कुशीत वसलेले गाव व धबधब्याचा स्वर्ग” आणखी एका युजरने लिहिलेय, “दुधीवरी खिंड पावसाळ्यात खूप भारी दिसेल. आम्ही २०१४ ला गेलो होतो” काही लोकांनी लिहिलेय की हे मंदिर पंढरपूरच्या मंदिराप्रमाणे दिसत नाही.