पावसाळा आला की सर्वत्र रिमझिम पाऊस पडतो आणि सारी सृष्टी हिरवीगार दिसू लागते. अशावेळी निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा मोह होण सहाजिक आहे. त्यामुळे पावसाळा सुरु होताच पर्यटक फिरायला जाण्याचे बेत आखतात. गड, किल्ले, धबधबे, घाट, आणि धरणाच्या परिसरात फिरण्याचा मनसोक्त आनंद लुटतात. आता पुण्याजवळ फिरायला जायचं म्हटलं तर सिंहगड, लोणवळा भूशी धरण, ताम्हिणी घाट असे काही ठिकाणे आहेत जिथे पर्यटक हमखास भेट देतात. शनीवार-रविवारी पर्यटकांचे मोठी गर्दी या पर्यटळस्थळी पाहायला मिळते. तुम्ही ही या विकेंडला ताम्हिणी घाटामध्ये फिरायला जाण्याचा बेत आखत असाल तर हा व्हिडीओ एकदा नक्की बघा.
ताम्हिणी घाट हे सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये वसलेल्या पश्चिम घाटामध्ये असलेले निसर्गरम्य ठिकाण आहे. पावसाळ्यात अनेक लोक निसर्गसौंदर्य भरभरून अनुभवण्यासाठी ताम्हिणी घाटाला आवर्जून भेट देतात. ताम्हिणी घाट महाराष्ट्रातील एक घाटरस्ता जो पुणे जिल्ह्यातील मुळशी आणि रायगड जिल्ह्यातील माणगांव यांना गावांना जोडतो. पावसाळ्यात टेकड्या हिरवाईने आच्छादलेल्या असतात आणि इथून मुळशी धरणाचे दृश्य अतिशय सुंदर असते. ताम्हिणी घाटातून उंचावरून वाहणारे सुंदर धबधबे पाहण्याचा आनंद काही वेगळाच असतो. येथे वाऱ्याचा वेग इतका जास्त असतो की उंचवरुन वाहणारे धबधबे उलटे वाहू लागतात. पावसाळ्यात भेट देण्यासारख्या ठिकाणांमध्ये ताम्हिणी घाट हा उत्तम पर्याय आहे. पण आज काल पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत हे त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी पहायाला मिळू शकते. दरम्यान तुम्हीही जर या विकेंडला ताम्हिणी घाटामध्ये फिरायला जाण्याचा बेत आखत असाल तर तुम्ही आधी हा व्हिडीओ बघा नाहीतर तुम्हीही असेच वाहतूक कोंडीमध्ये अडकू शकता.
हेही वाचा – ‘तो वाहून गेला अन् लोक बघत राहिले’, पुण्यातील तरुणाने धबधब्यात मारली उडी, थरारक घटनेचा Video Viral
हेही वाचा – मुसळधार पावसानंतर खचला रस्ता! भल्या मोठ्या खड्ड्यात अडकली कार, येथे पहा Viral Video
इंस्टाग्रामवर punewalaofficial नावाच्या खात्यावर ताम्हिणी घाटातील वाहनांच्या गर्दीचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहे. तुम्ही विकेंडला ताम्हिणी घाटातील निसर्गरम्य दृश्य पाहण्यासाठी जात असाल तर वाहतूक कोंडीचा सामना करण्याची ठेवा अन्यथा सोमवार ते शुक्रवार दरम्यान सुट्टी घेऊ तुम्ही ताम्हिणी घाटाला भेट देऊ शकता जेणेकरून तुम्हाला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही.
व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.