Viral Photo : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. अनेकदा जुन्या गोष्टी सुद्धा पुन्हा व्हायरल होतात. सध्या असाच एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये स्क्रीनवर “स्वारगेट” या स्थानकाचे मराठी भाषांतर “स्वर्गात” असे चुकीच्या स्वरूपात दिसून येत आहे. हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून सर्वत्र एकच चर्चा रंगली आहे. काही लोकांच्या मते, हा फोटो जुना आहे, जो पुन्हा व्हायरल होत आहे. “आता पुणे मेट्रोने स्वर्गात जाता येणार” अशा आशयाचे कॅप्शन देऊन हा फोटो सोशल मीडियावर सर्वत्र शेअर केला जात आहे. (pune photo viral of marathi translation of Swargate stop as Swargat on a Pune Metro station screen)
या व्हायरल फोटोमध्ये तुम्हाला एक स्क्रिन दिसेल. ही स्क्रिन पुणे मेट्रो स्टेशनवरील असल्याचा दावा केला जात आहे. या स्क्रिनवर मार्ग क्र, दरवाजा, स्थळ आणि अपेक्षित वेळ दिली आहे. या स्क्रिनवर तुम्हाला स्वारगेट या स्थळाचे मराठी भाषांतर ‘स्वर्गात’ असे लिहिलेले दिसून येईल. या व्हिडीओवर लिहिलेय, “आता पुणे मेट्रोने स्वर्गातही जाता येणार”
पाहा व्हायरल फोटो (Viral Photo)
_punethings या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा फोटो शेअर करण्यात आला असून या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “स्क्रीनवर दाखवण्यात आलेल्या “स्वारगेट” या स्थानकाचे मराठी भाषांतर “स्वर्गात” असे चुकीच्या स्वरूपात दिसून आले आहे. या चुकांची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत असून आता ‘पुणे मेट्रोने स्वर्गात जाता येणार’ असे पोस्ट सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे. पण सदर फोटो हा पुणे मेट्रोशी संबंधित नाही असे पुणे मेट्रोने जाहीर केले आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “इंग्रजीचा प्रॉब्लेम आहे मराठी लिहा वाचा” तर एका युजरने लिहिलेय, “स्वर्गात नाही ते स्वारगेट असेल” आणखी एका युजरने लिहिलेय, “हा खूप जुना फोटो आहे” काही युजर्सनी या फोटोवर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.