Pune accident video: सोशल मीडियावर दररोज हजारो प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात, मात्र काही व्हिडीओ खूपच आश्चर्यचकित करणारे आणि काळजाचा ठोका चुकवणारे असतात. असाच एक आश्चर्यकारक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. लहान मुलांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावं लागतं. त्यांच्याकडे झालेलं थोडसं दुर्लक्ष अनेकदा महागात पडू शकतं.त्यामुळे तुमच्या घरी लहान मुलं असल्यास ही बातमी नक्की वाचणं गरजेचे आहे. कारण हल्ली धावपळीचं आयुष्य जगताना आपल्या मुलांकडे दुर्लक्ष होतं आणि अनेक अनुचित प्रकार घडत आहेत. अशाच एका हृदयद्रावक घटनेचा व्हिडीओ पुण्यातून समोर आला आहे.

उन्हाळ्याचे दिवस आहेत लहान मुलांना शाळेला सुट्ट्या लागल्या आहेत. अशातच ही मुलं दिवसभर बाहेर खेळत असतात. पुण्यात अशाच एका मुलाचा खेळताना अचानक मृत्यू झालाय. इमारतीच्या खाली खेळताना अचानक वरुन झाडाची कुंडी या लहान मुलाच्या डोक्यात पडली आणि त्याचा जागीच मृत्यू झालाय. रहिवाशांच्या हलगर्जीपणामुळे एक जीव गेल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. आपल्या छंदामुळे कुणाचा जीव जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे अशी टीका होत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दुपारची वेळ आहे आणि लहान मुलं इमारतीच्या खाली मोकळ्या जागेत खेळत आहेत. ५, ६ मुलं आहेत आणि मुलांच्या हातात बॅट-बॉल दिसत आहे. यावेळी अचानक इमरतीतून एक झाडाची कुंडी खाली उभा असलेल्या चिमुकल्याच्या डोक्यावर पडते आणि तो खाली कोसळतो. यावेळी बाजुलाच असलेली महिला हे पाहते आणि तातडीनं त्या मुलाकडे धावते. यानंतर मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र यावेळी त्याचा मृत्यू झाला. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या हृदयाचा ठोका नक्कीच चुकेल.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ marathi_parivar96 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर वापरकर्त्यांचं लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज गेले आहेत. व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.