Vat Purnima 2024 Video: पिंपरी- चिंचवडच्या पिंपळे गुरव इथे जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी म्हणून वटवृक्षाला चक्क पुरुषाने सात फेरे मारले आहेत. महिलांच्या हक्काचा सण अशी ओळख असलेल्या वटपौर्णिमेला पुरुषांनी वडाला फेरे मारणे हा उपक्रम यापूर्वीही काही संस्थांनी राबवला होता, अनेकदा सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यात यायचे किंवा खिल्ली उडवली जायची. पण या खिल्ली उडवणाऱ्यांच्या पलीकडे जाऊन स्त्री- पुरुष समानतेला महत्त्व द्यायला हवे या विचाराने मानवी हक्क संरक्षण या संस्थेकडून हा उपक्रम यंदाही राबवण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष व सदस्यांनी आपापल्या पत्नीसह वटवृक्षाला सात फेरे मारले. हे या संस्थेचे दहावे वर्ष आहे मागील ९ वर्षांमध्ये संस्थेने वटपौर्णिमेच्या निमित्ताने वृक्षारोपणाचे कार्य सुद्धा केले आहे. आजच्या या कार्यक्रमात सहभागी मंडळींनी लोकसत्ताशी बोलताना काही महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित केले आहेत.
“स्त्री पुरुष समानता कागदोपत्री..”, वटपौर्णिमेनंतर पिंपरीतील महिलांनी मांडलं परखड मत; पुरुषांचं अनोखं सेलिब्रेशन पाहा
Vat Purnima Celebration: खिल्ली उडवणाऱ्यांच्या पलीकडे जाऊन स्त्री- पुरुष समानतेला महत्त्व द्यायला हवे या विचाराने मानवी हक्क संरक्षण या संस्थेकडून हा उपक्रम यंदा राबवण्यात आला.
Written by ट्रेंडिंग न्यूज डेस्क
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 21-06-2024 at 17:40 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
TOPICSट्रेंडिंग व्हिडीओTrending Videoपुणे न्यूजPune Newsवटपौर्णिमा २०२४Vat Purnima 2024व्हायरल व्हिडीओViral Video
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune pimpari chinchwad men celebrate vat purnima 2024 say blessed with wife video women say equality is only on page reacts on vasai murder svs