Puneri pati viral: ‘पुणे तिथे काय उणे’ असं म्हणतात, ते उगाच नाही. आतापर्यंत पुणेरी पाट्या, पुणेकरांची दुपारची झोप, असे किस्से आपण ऐकलेले आहेत. पुणेरी पाट्या जितक्या प्रसिद्ध आहेत, तितकीच पुण्यातील लोकांचे वेगळेपण प्रसिद्ध आहे. यामुळेच पुणे शहरातील लोकांचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत असतात. अगदी राजकीय विषयांवर कोटी पुणेरी पाट्यांमधून केली जाते. पुणेरी पाट्या लागल्याशिवाय निवडणूक संपतच नाहीत. आता पुणे शहरातील वाहतूक पोलीसाने हेल्मेटसंदर्भात जनजागृतीसाठी वापरलेला हा फंडा सोशल मीडियात चांगलाच चर्चेत आलाय. पुण्याच्या वाहतूक पोलिसांनी अनोखी शक्कल केली आहे. या पोलिसाने हेल्मेटबाबत जनजागृती करण्यासाठी रस्त्यावर पुणेरी होर्डिंग लावले आहेत.हे पुणेरी होर्डिंग पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल.

वाहतुकीच्या नियमाबाबत जनजागृती करण्यासाठी पोलिस विभाग वेगवेगळ्या युक्त्या आमलात आणत असते. अनेकदा पोलीस चालान कापण्याची मोहिम राबवतात. यादरम्यान अनेकांचा पोलिसाशी वादही होतो. हेल्मेट नसल्यामुळेही पोलीस दंड आकारतात, पण सध्या पुण्यातील पोलिसांनी होर्डिंग लावून जनजागृती केलीय. आता तुम्ही म्हणाल असं काय लिहलंय होर्डिंगवर? तर या होर्डिंगवर बाहुबलीचा फोटो लावण्यात आला असून त्याच्या बाजूला “बाहुबली जर हेल्मेट घालत असेल तर आपण का लाजतो? हेल्मेट वापरा सुरक्षित राहा…” असा संदेश लिहला आहे.

अनोखी जनजागृती

ही अनोखी जनजागृती पुण्यातील शिवाजीनगर वाहतूक विभागातर्फे करण्यात आली आहे. पुण्यात हेल्मेट न घालता मिरणवारी अनेक लोक तुम्ही पाहिली असतील. हेल्मेट सक्तीला मस्करी ठरवत अनेक जण ते घालत नाही. कधीतरी अपघात होतो मग हेल्मेटचं महत्त्व कळतं. पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.अनेक जण आगाऊपणा करत हेल्मेट घालण्याला विरोध करतात. आता पुणे वाहतूक पोलिसांनी याची गंभीर दखल घेत अनोख्या पद्धतीने जनजागृती सुरु केली आहे

पाहा पुणेरी होर्डिंग

हेही वाचा >> तुमची प्रिय व्यक्ती घरी वाट बघत आहे; प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्यामध्ये अडकला तरुणाचा पाय…प्रवाशांनो थरारक VIDEO पाहाच

पुण्यात सर्वाधिक वाहन

देशात सर्वाधिक वाहने पुणे शहरात आहे. पुणे शहरातील वाढत्या वाहनांच्या संख्येबरोबर अपघातही वाढले आहेत. या अपघातांमध्ये अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो. यामुळे काही वर्षांपूर्वी हेल्मेट सक्ती पुण्यात करण्यात आली होती. पुण्यात हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई केली जात होती. मात्र आता पोलिसांनी सक्तीपेक्षा जनजागृती करण्याचा प्रयत्न सुरु केलाय. अनेकदा भारतीय पोलिसांची अशी अनोखी स्टाइल सोशल मीडियावर व्हायरल होत असते. या व्हिडिओवर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत.