Viral Video: सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात स्वत:ची गाडी असणे वाहतुकीच्या दृष्टीने सोईस्कर ठरते. काही वेळा गरज म्हणून नव्हे, तर छंद म्हणूनही गाडी चालवली जाते. तसेच गाडी चालविताना वाहतुकीचे नियम माहीत असणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे गरजेचे असते. पण, आपल्यातील अनेक जण बेपर्वाईने वाहन चालवून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करतात. मग वाहतूक पोलिसांनाही अशा बेफिकीर व्यक्तींकडून दंड वसूल करावा लागतो. पण, आज सोशल मीडियावर एक अनोखं दृश्य पाहायला मिळालं आहे. त्यात एक गाय लाल सिग्नल असल्याने रस्ता ओलांडण्यासाठी थांबून राहिल्याचे दिसून आले आहे.

व्हायरल व्हिडीओ पुण्याचा आहे. या व्हिडीओमध्ये पुण्यातील रस्त्यावर वाहतूक नियंत्रक दिव्यानजीक अर्थात ट्रॅफिक सिग्नल्सपाशी एक गाय उभी असल्याचे दिसते. ती वाहतूक नियंत्रक दिव्याचा रंग लालवरून कधी हिरवा होतोय याची वाट पाहत आहे. मुका प्राणी असलेल्या नवलाईची वाटणारी ही गाईची सतर्कता पाहून वाहतूक पोलिसांनाही कमाल वाटली. मग पुणे पोलीस विभागाने रस्ता सुरक्षेचा प्रचार करण्यासाठी या व्हिडीओचा वापर केला आहे आणि नागरिकांना खास संदेश दिला आहे. पुणे पोलीस नेमके काय म्हणाले आहेत ते त्यांनी शेअर केलेल्या पोस्टमधून एकदा तुम्हीसुद्धा बघा.

motorist, police dragged, barricade, police,
मोटार तपासण्यासाठी थांबविण्यास सांगितल्याने पोलिसाला बॅरिकेटसह २० फुटापर्यंत फरफटत नेले; वाचा कुठे घडली ही घटना
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Ignorance of Municipal Corporation and Traffic Police Department towards not working traffic signal
नागपूर : बंद वाहतूक सिग्नल; वाहनचालकांना मन:स्ताप, महापालिका-वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
political parties in uttar pradesh hail sc judgement on bulldozer action
‘बुलडोझर दहशत’, ‘जंगल राज’ संपेल! निकालाचे विरोधी पक्षांकडून स्वागत; सरकारची सावध प्रतिक्रिया
No one will be able to change constitution of Dr Babasaheb Ambedkar in country says nitin gadkari
गडकरी म्हणतात,‘ डॉ. आंबेडकर यांचे संविधान बदलविण्याचा प्रयत्न…’
bull Fight Viral Video | Bull Attack on boy Wearing Red Shirt
“शिंगांनी उडवलं अन् लाथांनी तुडवणार इतक्यात…”, पिसाळलेल्या बैलाचा व्यक्तीवर हल्ला; पाहा थरारक Video
Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित

हेही वाचा…कलेला वय नसते! साडी नेसून नृत्यकौशल्य दाखविणाऱ्या ९५ वर्षीय आजींना पाहा; VIDEO तील ‘सादगी’ जिंकेल तुमचेही मन

पोस्ट नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, पुण्यातील ट्रॅफिकचे दृश्य दाखविण्यात आले आहे. जेव्हा कॅमेरा हळूहळू रस्त्याच्या एका विशिष्ट भागाकडे वळतो तेव्हा गाय दिसू लागते. इतर वाहनचालकांप्रमाणे सिग्नलचा रंग हिरवा होण्याची ती धीराने वाट पाहताना दिसते आणि दुचाकीस्वार व कार यांच्यामध्ये थांबून उभी असते. रस्त्यावरचे वाहतूक नियंत्रक दिवे अर्थात ट्रॅफिक सिग्नल्स खांबांवर लाल, हिरवा किंवा पिवळा दिवा लागताना होणारी वाहनांची धावपळही व नागरिकांची उडणारी तारांबळ आपण सर्वांनीच पाहिली असेल. पण, एक गाय वाहतुकीचे नियम पाळते आहे पाहून अनेकांना आश्चर्य आणि कौतुक वाटतेय.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @punepolicecity यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच अटेन्शन Guy’s… सिग्नलवर लाल दिवा असताना पुढे जाऊ नका! असे लिहीत गाईला वाहतुकीचे नियम पाळताना पाहून ‘ये गं ‘गाई’ गोठ्यात, वाहतुकीचे नियम पाळत!’ #नियम म्हणजे नियम’, अशी कॅप्शन त्यांनी पोस्टला दिली आहे; जी सध्या अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. तसेच सोशल मीडियावर वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या या गाईचे कमेंट्समधून कौतुक होत आहे.