असे म्हणतातकी,”पुण्यात गाडी चालवणे खूप अवघड आहे”, कारण पुण्यात वाहन चावलताना अनेक लोक वाहतूकीचे नियम पाळत नाही. बेशिस्तपणे वाहन चालवतात. कधी हेल्मेट न वापरताच बाईक चालवतात तर कधी सिटबेल्ट न लावता कार चावलतात. कधी भरधाव वेगाने धावणारी वाहन दिसतात तर कधी ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अनेकदा अपघाताच्या घटना घडताना दिसतात. नुकतीच पुण्यातील बाणेर पाषाण लिंक रोडवर शनिवारी एका महिलेवर कार चालकाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. दरम्यान आणखी एका घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. अनेकदा पुण्यात पीएमसी बस आणि इतर वाहनांचे अपघात झालेले दिसतात. त्यामुळे बस चालक आणि वाहनचालकांमध्ये वाद ही हताना दिसतात. अशाच एका घटनेच्या व्हिडीओमध्ये एक पोलिस कर्मचारी बसचालकास बेदम मारहाण करताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. त्यात पोलिस कर्मचाऱ्याने बससमोर दुचाकी लावून बस अडवली आणि बसमध्ये चढून बसचालकाना मारले.
येथे पाहा व्हिडीओ
हेही वाचा – गुपचूप येतात, अंगावर खाज सुटणारी पावडर टाकतात अन् लक्ष विचलित होताच…. खुजली गँगचा Video Viral
व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते एक पोलिस कर्मचाऱ्याच्या गणवेशामध्ये एक व्यक्ती बसमध्ये चढून बस चालकाला मारहाण करताना दिसत आहे. पोलिस कर्मचाऱ्याने हेल्मेट घातले आहे त्यामुळे त्याचा चेहरा दिसत नाही. बसचालक मला मारतो कशाला? अडचण काय आहे? तू मला मारू नको? त्यावर पोलिस अधिकारी त्याला खाली उतर असे म्हणतो. त्यानंतर चालक पोलिसाची कॉलर पकडून दूर ढकलतो आणि विचारतो, “तुझी काय समस्या आहे? तू मला मारू नको.” पोलिस कर्मचारी त्याला कॉलर सोडण्यास सांगतो आणि त्यांच्यात झटापट होते. बस चालक पुन्हा विचारतोस की, तुझी अडचण काय आहे, “मी तुला मारलं, पाडलं, धडकवलं आहे का? तुझी गाडी दाबली आहे का”? त्यावर संतापलेला पोलिस कर्मचारी म्हणतो, “माझी गाडी दाबली नाहीस का? बस चालकास विश्वासाने सांगतो, “मी तुझी गाडी दाबली नाही. तिथे बाधंकाम सुरु होते. अर्धे काम रस्त्यावर आले आहे. माझी गाडी सरळ होती तू चूकीचे दिशेने आला.” त्यानंतर पोलिस कर्मचारी चालकास सोडतो आणि बस चालकाला बस चौकीवर घेण्यास सांगतो आणि बसमधून उतरतो.
हा व्हिडिओ बसमध्ये बसलेल्या प्रवाशाने शुट करून सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. व्हिडिओ imvivekgupta नावाच्या पेजवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यापासून तुफान चर्चेत आला आहे. व्हिडीओवर नेटकरी कमेंट करताना दिसत आहे. व्हायरल व्हिडीओवर कमेंट करताना एकाने लिहिले, “आता सरकारने कर्मचाऱ्यास मारहाण केल्याचा कायदा कोण कोणाविरुद्ध वापरणार?” दुसऱ्याने लिहिले की, कालही एक असाच किस्सा झाला बस नं ६४ मध्ये” तिसरे म्हणाला, “आता पुणे एकदम खराब झाले आहे. काहीही होत असते इथे”
© IE Online Media Services (P) Ltd