Viral Video : सध्या पावसाळा सुरू आहे आणि पुण्यात पावसाने थैमान घातले आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात सतत पाऊस सुरू आहे. गेल्या आठवड्यात पुण्यात पावसाची परिस्थिती पाहायला मिळाली होती. रस्ते, नाले , नदी आणि तलाव ओसंडून वाहत होते. लोकांच्या घरात पाणी शिरले होते. पुण्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. (pune rain video once again extreme rain in pune Khadakwasla Dam video is going viral)
रविवारी सुद्धा असेच चित्र शहरात पाहायला मिळाले.पुण्यातील संततधार पाऊस आणि खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने पुण्यात अनेक ठिकाणी पूर परिस्थिती पाहायला मिळाली. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने एकता नगरसह अनेक भागात पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ दिसून आली. या ठिकाणी मदतीसाठी भारतीय सैन्य दलाची तुकडी तैनात करण्यात आली होती.
खडकवासला धरणाचा VIDEO होतोय व्हायरल
सोशल मीडियावर पुण्यातील पावसाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे.सध्या खडकवासला धरणाचा एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये खडकवासला धरण दाखवले आहेत. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने पाण्याची पातळी वाढली आहे. या व्हिडीओवर लिहिलेय, “पुण्यात पुन्हा एकदा पावसाचा कहर, खडकवासला धरण”
काही दिवसांपूर्वी सुद्धा असाच खडकवासलाचा व्हिडीओ समोर आला होता. त्या व्हिडीओत सुद्धा पाऊस वाढल्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवलेला दिसून आला होता.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)
punewatavaran या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पुण्यात पुन्हा एकदा पाण्याचा कहर” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
हेही वाचा : Video: अचानक रस्ता खचला, पाईपलाईनही फुटली अन् खड्ड्यात पडून नगरसेवकासह ६ जण जखमी; भयानक दृश्य कॅमेरात कैद
हवामान विभागाने पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नागरिकांनी सतर्क राहावे व स्थानिक शासकीय यंत्रणेकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी पुण्यात आलेल्या पूर परिस्थितीमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. नागरिकांना पुन्हा पुराचा त्रास होऊ नये म्हणजे, स्थानिक पातळीवर शासकीय यंत्रणा काम करत आहे.