Pune Rain Viral Video : परतीच्या पावसाने महाराष्ट्राच्या अनेक भागात हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहरात जोरदार पाऊस सुरू आहे. बुधवारी पुण्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडल्याने रस्त्यांना नदीचे स्वरुप आले आहे आणि ओढे आणि नाले ओसांडून वाहत आहे.
पाण्यामुळे रस्ते ब्लॉक, पुणेकरांची उडाली तारांबळ
बुधवारी पुणे जिल्ह्यासाठी रेडअलर्ट दिलेला असून पुढील २४ तासांत जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीहोण्याबाबत हवामान विभागाचा अंदाज व्यक्त केला आहे. याविषयी महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयांतर्गत जिल्हा माहिती कार्यालय पुणे कार्यालयाचे अधिकृत एक्स हँडलवरून याविषयी माहिती दिली आहे.
पुण्यात थोडा जरी पाऊस झाला तरी रस्ते ब्लॉक होतात. गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात हीच परिस्थिती दिसून येत आहे. सदाशिव पेठ, नारायण पेठ, शनिवार पेठ, डेक्कन, नवी पेठ, जे एम रोड अशा भागांत ठिकठिकाणी पाणी साचले. सोशल मीडियावर अनेक पुणेकरांनी पावसाचे व्हिडीओ शेअर केले आहेत. काही लोक या परतीच्या पावसाचा आनंद लुटताना दिसत आहे तर काही लोकांनी त्यांना होत असलेल्या नाहक त्रासामुळे संताप व्यक्त केला आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)
या युजरने रस्त्यावर साचलेल्या पाण्याचे व्हिडीओ शेअर करत पुणे महानगपालिकेवर खोचक शब्दात टिका केली आहे.
या युजरने लिहिलेय, “पुण्यात पाऊस पडत आहे”
एका युजरने लिहिलेय, “पाऊस आणि पाऊस, सगळीकडे पाऊसच पाऊस”
एका युजरने लिहिलेय, “पुणे नगर रोडवर जोरदार पाऊस”
एका युजरने लिहिलेय, “जोरदार पावसाने पुण्यात पाणी साचले आहे.”
पुणे शहरातील जंगली महाराज रोडला अर्ध्या तासाच्या मुसळधार पावसानं आलेले ओढ्याचे स्वरूप, पाहा व्हिडीओ
पुणे महानगरपालिकेच्या पीएमसी केअर प्रकल्पाचे PMC Care या अधिकृत एक्स अकाउंटवरून विसर्गाबाबत अत्यंत महत्त्वाची सूचना दिली आहे. त्यांनी लिहिलेय, “खडकवासला, पानशेत आणि वरसगाव धरण क्षेत्रात पावसाला सुरुवात झालेली असून आवश्यकतेनुसार मुठा नदी पात्रात विसर्ग सोडण्यात येऊ शकतो. तरी नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.”