Pune Rain Update : महाराष्ट्राचे सांस्कृतिक शहर पुणे हे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते. येथील ऐतिहासिक वास्तु, मंदिरे आणि पर्यटन स्थळे बघण्यासाठी दुरवरून लोक येतात. पुणे शहराची एक अत्यंत आगळी वेगळी ओळख आहे.पुणे शहर प्रत्येकाला प्रिय वाटते पण पुण्याची एक अशी समस्या आहे जी मात्र अनेकांसाठी त्रासदायक ठरते, ती समस्या म्हणजे येथील पाऊस. पुण्यात अर्धा तास सलग पाऊस पडला तरी सुद्धा पुण्याच्या रस्त्यावर नदीप्रमाणे पाणी साठलेले दिसते.
रविवारी १८ ऑगस्ट रोजी हीच स्थिती दिसून आली. पुण्यात सगळीकडे रस्त्यावर पाणी साचलेले दिसून आले. याचे काही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एम्प्रेस बॉटनिकल गार्डनचा रस्ता दिसले. या रस्त्यावर जोरदार पाऊस सुरू आहे आणि पावसाचे पाणी रस्त्यावर साचताना दिसत आहे.
हा व्हिडीओ पुण्याच्या रस्त्यावरील आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसले की पीएमटी बसमधून हा व्हिडीओ काढला आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की रस्त्यावर एवढं पाणी साचले आहे की पीएमटी अगदी हळू हळू गाडी चालवत आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्हाला रस्त्यावर खूप जास्त पाणी साचलेले दिसेल. एक कार व लहान टेम्पो रस्त्यावरील पाण्यात अडकलेला दिसत आहे. पुढे या व्हिडीओत पुण्यातील अनेक ठिकाणचे जलमय दृश्ये दाखवले आहेत.
पुणे रेल्वे स्थानकावरील हा व्हिडीओ सध्या चर्चेचा कारण ठरला आहे.रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारातच तळे साचलेले दिसून आले. याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागला. आता पुणे रेल्वे स्थानकाच्या दुरावस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
या खालील दोन व्हिडीओमध्ये रस्त्यावर भयंकर पाणी साचलेले दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. सध्या हे दोन्हीही व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओवर अनेक युजर्सनी संताप व्यक्त एका आहे. एका युजरने लिहिलेय, “पुणेकर कारणीभूत तुम्ही स्वतः आहात ….” तर एका युजरने लिहिलेय, “पुण्यात पाणी नाही तर पाण्यात पुणं”
आणखी एका युजरने लिहिलेय, “पावसाळ्यात PMPML बसेस बंद करून जहाजांची व्यवस्था केली पाहिजे” आणखी एका युजरने लिहिलेय, “मस्त पाऊस झाला यार काय तापत होते. आता छान वाटत आहे” एक युजर लिहितो, “दरवर्षी पुण्यात पाऊस पडल्यावर ही स्थिती पाहायला मिळते. ही स्मार्ट सिटी आहे” अनेक युजर्सनी हा व्हिडीओ पाहून संताप व्यक्त केला आहे तर काही लोकांनी प्रशासनावर हल्लाबोल केला आहे.