पुणेरी शैलीत टोला लगावणाऱ्या पुणेरी पाटी जगभर प्रसिद्ध आहेत. पुणेकरांना स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाते. हाच स्पष्टवक्तपणा पुणरी पाटीमध्येही पाहायला मिळतो. पुणेकरांना कोणतीही गोष्ट पटली नाही तर इतरांना समजावायला जात नाही ते फक्त पुणेरी पाटी लावतात. पुणेरी पाटीमुळे खोचक शब्दात समोरच्याला मुद्दा कळतो आणि टोलाही लगावला जातो. अनेकदा पुण्यात नो पार्किंग करणार्‍यांना, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या टोला लगावणाऱ्या पुणेरी पाट्या पाहायला मिळतात. अशीच एक पुणेरी पाटी सध्या चर्चेत आली आहे.

पुणेरी पाटी चर्चेत

पुण्यात अनेकदा बेशिस्त वाहनचालक भेटतात जे सर्रासपणे वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात. कधी नो पार्किंगमध्ये गाडी पार्क करतात, कधी पदपथावरून तर कधी सायकल ट्रॅकवरून गाड्या चालवतात, कधी चुकीच्या दिशेने गाडी चालवतात तर कधी विनाकारण हॉर्न वाजवत बसतात. अशा बेशिस्त वाहनचालकांमुळे अनेकांना त्रास होतो. लोकांना सतत इतकी घाई असते की सिग्नल थांबवल्यावरही विनाकारण हॉर्न वाजवत असतात.

aishwarya rai says chala chala in marathi video viral
Video: पती अभिषेक बच्चन अन् लेकीबरोबर मुंबईत परतली ऐश्वर्या राय; मराठीत म्हणाली असं काही की…, पाहा व्हिडीओ
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Emotional video of a kid selling coconuts from boat hardworking child video viral on social media
जबाबदारी बालपणही हिरावून घेते! लहान मुलाच्या संघर्षाचा ‘हा’ VIDEO पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात येईल पाणी
Viral video of a friend putting firecracker in their mouth on social media
आयुष्याचा खेळ करू नका! सुतळी बॉम्ब पेटवला अन् मित्राच्या तोंडात टाकला, पुढे काय घडलं? पाहा VIDEO
Korean woman's reaction after tasting aloo poori has 25 million views
कोरियन तरुणीने पहिल्यांदाच खाल्ली पुरी भाजी, पुढे काय घडलं? पाहा Viral Videoमध्ये
pune video crowd at pune railway station
“निम्मं तरी पुणे रिकामे झाले” पुणे रेल्वे स्टेशनवर तुफान गर्दी, Video होतोय व्हायरल
Viral shocking accident while overtaking The Car Fell From The Bridge While Overtaking Accident Video
अंगावर काटा आणणारा अपघात, पुलावरून कार थेट खाली कोसळली; VIDEO पाहून सांगा नेमकी चूक कुणाची?

हॉर्न वाजवणाऱ्या पुणेरी काकांचा टोला

सतत हॉर्न वाजवून त्रास देणाऱ्या वाहनचालकांना पुण्यातील एक रिक्षाचालक काका चांगलेच वैतागले आहेत. या बेशिस्त लोकांना बंदोबस्त करण्यासाठी वैतागलेल्या पुणेरी काकांनी थेट रिक्षामागे पाटी लावली आहे ज्यावर लिहिले की, “हॉर्नचा वापर कमी करा, इथे कोणी मुक्कामी आले नाही.” जेणेकरून रिक्षाच्या मागे जे कोणती गाडी असेल ते ही पाटी वाचून उगाच हॉर्न वाजवणार नाही.

हेही वाचा –Video : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी पुणेकरांची गर्दी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराबाहेर भक्तांची भली मोठी रांग

व्हिडीओ इंस्टाग्रामवर puneri_explorer नावाच्या पेजवर पोस्ट केला आहे आणि सध्या व्हायरल होत आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, पुण्यातील रिक्षावाले काका वैतागले आहेत सारखा हॉर्न मारणाऱ्या लोकांवर”

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा – “एक चूक अन् खेळ खल्लास!” स्विमिंग पुलमध्ये तरुणाची नको ती स्टंटबाजी, Viral Video पाहून अंगावर येईल काटा

व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिले की, “खरच आहे हे कारण लोक सिग्नलला थांबले तरी हॉर्न वाजवतात.”

Story img Loader