Woman Caught Washing Veggies in Polluted Mutha River : भाजी हा आपल्या रोजच्या आहारातील महत्त्वाचा भाग आहे कारण त्यात भरपूर पौष्टिक घटक असतात, त्यामुळे घरातील मोठ्यांपासून सर्वच जण आहारात भरपूर भाज्यांचा समावेश करण्याचा सल्ला देतात. पण बाजारातून आणलेली भाजी खरचं स्वच्छ असते का?
भाज्या ताज्या ठेवण्यासाठी विक्रेत्यांना पाण्याचा वापर करावा लागतो अनेकदा विक्रेते कोणत्याही पाण्याचा वापर करताना दिसतात. कधी रस्त्यावर साचलेल्या पाण्यामध्ये भाज्या धुतात तर कधी गटारामधील पाणी वापरतात. अशा घटनांचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. त्यामुळे बाजारातून आणलेली भाजी खरंच स्वच्छ आणि आरोग्यादायी आहे का असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित करणारा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये एक महिला नदीच्या अस्वच्छ पाण्यामध्ये भाज्या धुताना दिसत आहे. व्हिडिओ पाहून सावधानतेचा इशारा दिला जात कारण अशा पद्धतीने अस्वच्छ पाण्यात धुतलेल्या भाज्या खाल्या तर ते आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
दुषित नदीच्या पाण्यात भाज्या धुतानाचा Video Viral (Viral video of washing vegetables in polluted river water)
व्हायरल व्हिडिओ हा पुण्यातील आहे. पुण्यातील मुठा नदी किनारी एक महिला बसलेली आहे. नदीच्या अस्वच्छ पाण्यामध्ये भाज्या धुताना दिसत आहे. मुठा नदी पात्रात सांडपाणी सोडले जात असल्याने हे पाणी प्रक्रिया न करता वापरणे आरोग्यासाठी अपयाकारक ठरू शकते. अशा परिस्थितीमध्ये या पाण्यात भाज्या धुतल्या जात असल्याचे पाहून पुणेकरांना धक्का बसला आहे. पुणेकरांना भाजी खरेदी करताना सावध राहण्याचा इशारा हा व्हिडिओ देत आहे.
पुणेकर काय म्हणाले
व्हायरल व्हिडिओ इंस्टाग्रामवर wajed.khan.359 नावाच्या पेजवर पोस्ट केला आहे. पाणी किती स्वच्छ आहे हे फक्त पुणेकरांना माहित आहेत असे कॅप्शन दिले आहे.
एकाने कमेंट केली की, ,”म्हणूनच शेतकऱ्यांचा मालाला चांगली किंमत द्या. चांगले खा. सुरक्षित राहा. जय जवान, जय किसान.”
दुसऱ्याने कमेंट केली की,”अनधिकृत फेरीवाले हटवा.”
तिसऱ्याने कमेंट केली की, “मग, सरकारला नद्या स्वच्छ करायला सांगा.”
चौथा म्हणाला की, “तुम्ही भाजी बद्दल बोलत आहात पण त्या नदीचे रुपांतर गटारीमध्ये झाले आहे त्याकडे लक्ष दिले पाहिजे. नदी स्वच्छ असती तर त्यात धुतलेल्या भाज्या स्वच्छ धुवून निघाल्या असत्या.”