Viral Video : नुकताच २२ जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या खास दिवशी असंख्य लोक अयोध्येसह देशभरात जल्लोष साजरा करताना दिसून आली. उद्घाटनाच्या दिवशी अयोध्येत गर्दी होऊ नये म्हणून अनेक लोकांनी अयोध्येला जाणे टाळले पण आता मात्र अनेक जण प्रभू रामाच्या दर्शनासाठी अयोध्या नगरी जात आहे. सोशल मीडियावर याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. सध्या असाच एक पुण्यातील ढोल पथकाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या ढोल पथकाने अयोध्येत मंदिराबाहेर ढोल वादन करत श्रीरामांना अनोखी मानवंदना दिली आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Loksatta (@loksattalive)

gold robbery viral video
पिस्तुलाचा धाक दाखवून दागिने लुटणार इतक्यात उलटला चोरांचा डाव; दुकानदाराने असे काही केले की…; VIDEO पाहून हसाल पोट धरून
Shocking video of a Young man broke the glass and entered the cabin of woman employee harassment video viral
“अर्ध्या तासांनी या” हे सांगितल्यावर महिला कर्मचाऱ्याच्या केबिनची…
viral post indian origin ceo daksh gupta death threats
ऑफिसमध्ये ८४ तास काम, बॉसला सोशल मीडियावर जीवे मारण्याच्या धमक्या; कंपनीची वर्क पॉलिसी वाचून युजर्स शॉक
Shocking video up mathura vrindavan banke bihari mandir viral video guards fought with devotees
“मूर्तीजवळ उभे राहून स्वतःला मालक समजू नका” मंदिरात सुरक्षारक्षकांनी भक्तांबरोबर काय केलं पाहा; VIDEO पाहून सांगा चूक कुणाची
Woman fell down from stairs at railway station video viral on social media says it is a prank
बापरे! पायऱ्यांवरून घसरत खाली आली अन्…., रेल्वे स्थानकावर महिलेला आली चक्कर, पण पुढे जे घडलं ते पाहून तुमचाही राग होईल अनावर, पाहा VIDEO
Pure love Between elephant and caretaker
‘हा आहे भारत…’ हत्ती घेतोय माहुताकडून पाय चेपून; एक पाय पुढे केला अन्… पाहा VIRAL VIDEO
Man Falls From Stage While Dancing To Impress A Girl Funny Video goes Viral
काय गरज होती का? मुलीला इंप्रेस करण्यासाठी स्टेजवर गेला अन् झाला मोठा पचका; VIDEO पाहून पोट धरुन हसाल
Dog Beat Leopard In The Jungle Fight Animal shocking Video goes Viral
“म्हणून कुणालाच कमी समजू नका” शिकार करायला आलेल्या बिबट्याला कुत्र्यानं फाडून टाकलं; थरारक VIDEO व्हायरल
Girl Students fighting on the road terrifying video went viral on social media
चालत्या स्कूटरवरून खाली खेचलं अन्…, भररस्त्यात दोन विद्यार्थीनींचा राडा, एकमेकींच्या अंगावर बसून केली मारहाण, पाहा VIDEO

Dinanath Kholkar या एक्स अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “श्रीराम पथक पुणे, यांनी २४ आणि २५ जानेवारीला अयोध्या इथे श्रीराम चरणी वादन सेवा केली, त्यातील हा एक छोटासा भाग.”
त्यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की असंख्य पुणेकर हातात ढोल आणि भगवा घेऊन ढोल वादन करताना दिसत आहे. त्यांनी पिवळा आणि पांढरा रंगाचा पोशाख परिधान केला आहे. राम मंदिराच्या बाहेर ते ढोलवादन करताना दिसत आहे. ढोलच्या आवाजात राम मंदिर दुमदुमलेले दिसत आहे. राम मंदिराबाहेर शिवरायांचा जयघोष ऐकून तुम्हालाही अभिमान वाटेल.

ढोल ताशा हा पुण्याची आण बाण आणि शान आहे. ढोल ताशा संस्कृती ही पुण्याची खास ओळख आहे. गणोशोत्सव असो किंवा कोणताही छोटा मोठा कार्यक्रम पुणेकर ढोल ताशा वाजवून उत्सव साजरा करतात. राम मंदिराच्या उद्घटानिमित्त उत्सव साजरा करण्यासाठी पुण्याच्या या ढोल पथकाने थेट अयोध्या गाठली आणि मंदिरासमोर शिवरायांचा जयघोष करुन ढोल वादन केले.

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिली आहे. एका युजरने लिहिलेय, “मला असे वाटते की जणू मंदिराच्या आतमध्ये श्रीरामाचा राज्यभिषेक होत आहे आणि बाहेर प्रजा उत्सव साजरा करत आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “दणदणीत”