हर्षल जुईकर हा अमेरिकन तंत्रज्ञान कंपनी गुगलसाठी काम करत आहे.५१.३६लाख रुपये वार्षिक पगार घेऊन त्यांनी या कंपनीत आपल्या करिअरची सुरुवात केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हर्षल जुईकर एमआयटी-वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी आहे. त्यांनी ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीमध्ये एमएससी केले आहे. या यशाचे श्रेय तो आपल्या जिद्दीला देतो. इतर विद्यार्थ्यांनाही त्यांचा हाच सल्ला आहे. कठोर परिश्रम करा आणि अपारंपारिक क्षेत्र एक्सप्लोर करण्यास घाबरू नका.
कोणतीही इंजिनिअरिंग किंवा मॅनेजमेंज बॅकग्राऊंड नाही
पुण्यातील हर्षल जुईकर या विद्यार्थ्याने नुकतेच नॉन-इंजिनीअरिंग पदवी घेतली असूनही गुगलमध्ये भरघोस पगाराची नोकरी मिळवली आहे. जुईकरचे कौशल्य आणि दृढनिश्चय ओळखून कंपनीने त्याला ५१.३६ लाखांच्या वार्षिक पॅकेजसह नियुक्त केले. तो गुगल डेव्हलपर स्टुडंट क्लबचा अध्यक्ष आहे.
स्वतःशी खोटे बोललो नाही
हर्षल जुईकर पुण्यात लहानाचा मोठा झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी संपादन केली. त्यानंतर एमआयटी-वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे येथून ब्लॉकचेन टेक्नलॉजीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केले. यानंतर त्यांनी गुगल जॉईन केले.”आपली आवड जोपासण्याचे धाडस केले”, असे तो सांगतो. अर्थात हा प्रवास आव्हाने आणि अडचणींनी भरलेला होता. पण, तो कधीच स्वतःशी खोटं बोलला नाही. पारंपरिक मार्ग सोडून त्यांनी नवा मार्ग स्वीकारला आणि त्याचा त्याला फायदा झाला. त्याला मिळालेल्या यशाची कल्पनाही करू शकत नाही.
हेही वाचा – इंडिया पोस्टमध्ये मेगा भरती! ३०,०४१ पदांसाठी होणार भरती, जाणून घ्या कोण करू शकते अर्ज
हर्षलचा विद्यार्थ्यांना सल्ला
हर्षल जुईकर यांनी चांगल्या कंपन्यांमध्ये काम करण्याचे ध्येय असलेल्या विद्यार्थ्यांना सल्लाही दिला आहे. त्यांच्या मते, नेहमी उत्सुकता बाळगा. एक्सप्लोर न केलेले क्षेत्र एक्सप्लोर करण्यास घाबरू नका. या शोधात तुमचा उद्देश शोधता येईल.
हेही वाचा – अचानक आकाशातून रस्त्यावर कोसळलं विमान अन्…..पाहा थरारक व्हिडीओ
ना IITमधून, ना IIMमध्ये शिकला
टेक्नॉलॉजी क्षेत्रातील दिग्गज महाविद्यालयीन पदवीधरांना चांगल्या पगाराच्या पॅकेजवर नियुक्त करत आहेत. परंतु, यातील बहुतांश विद्यार्थी एकतर इंजिनिअरिंग किंवा मॅनेजमेंट क्षेत्रातील आहेत. हर्षल जुईकरने कोणत्याही इंजिनिअरिंग किंवा मॅनेजमेंट पदवीशिवाय चांगल्या पॅकेजची नोकरी मिळवून एक प्रकारचा विक्रम केला आहे. हर्षल IIT किंवा IIMमध्ये शिकलेला नसूनही त्याने एवढे चांगले पॅकेज मिळवल्याबद्दल त्याचे कौतूक होत आहे.