Funny video: पुण्यामध्ये अनेक असाध्य गोष्टी सहज घडताना दिसतात. रिल्ससाठी काही तरुण डोलेजंग इमारतींवर चढतात तर कधी गाडींवर बसून स्टंटबाजी करतात. रिल्ससाठी अगदी दऱ्याखोऱ्यामध्ये देखील जातात. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. आता आणखी एक पुण्यातील व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये एका कार चालकाला चुकीच्या दिशेनं कार चालवणं महागात पडलंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये काही अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. पुणेकर त्यांच्या वैशिष्टपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात.‘तुम्हाला प्रत्येक विषयात स्वत:चे मत नसेल तर येथे प्रवेश नाही’ अशा इशार्‍यापासून ते ‘पगडीखालची खरी बुद्धिमत्ता काय असते हे पाहायचंय?’ असे आव्हान फक्त एकाच शहरात दिले जाऊ शकते, ते म्हणजे पुणे. कमीत कमी शब्दांत समोरच्याचा जास्तीत जास्त अपमान करण्याची कला पुणेकरांनाच साधली आहे, असे म्हणतात. पुणे तिथे काय उणे असं म्हंटलं जातं. त्यामुळे पुणेकरांच्या नादाला लागण्याआधी लोक शंभर वेळा विचार करतात. अशाच एका पुणेरी बस ड्रायव्हरनी कार चालकाला चांगलाच धडा शिकवला आहे.

नेमकं काय घडलं?

ही घटना पुण्यातील नेहरु मेमोरीअल चौकातील हा व्हिडीओ असल्याचं सागंण्यात येत आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता एका कार चालकानं त्याची कार ट्रॅफिक असल्यानं विरुद्ध दिशेला चालवण्यास सुरुवात केली. यावेळी समोरुन वाहनं येऊ लागली आणि सगळीकडेच ट्रॅफिक जाम झालं. अशातच समोरुन आलेल्या पीएमपी बस ड्रायव्हरनं कार चालकाला रस्ता न देता त्याला कार मागे घेण्यास सांगितले आणि बस हळू हळू पुढे नेऊ लागले. अशाप्रकारे बस ड्रायव्हरने दाखवलेल्या जागरुकतेमुळे वाहतूक नियम भंग करणाऱ्या कार चालकाला चांगलाच धडा मिळालाय.

पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ सोशल मीडियावर _punethings नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असून बस ड्रायव्हरचं कौतुक करत आहेत.