Pune viral video: पुणे शहर म्हंटलं की हल्ली वाहतूक नियमांचं उल्लंघन करण्याची जणू स्पर्धा सुरू असल्यासारखी परिस्थिती आहे. पुढच्यान नियम मोडला की मागच्यानेही नियम मोडायचा आणि मग एका मागोमाग एक असे बरेच पुणेकर नियम मोडण्याचा तोच कित्ता गिरवतात. वाहतूक पोलिसांनी वाहन पकडल्यावर अथवा कारवाई केल्यावर अनेकदा पोलीस आणि वाहनचालक यांच्यात वाद होतात. त्यातच अशात सरकारने वाहतूक दंड बऱ्याच प्रमाणात वाढवल्याने असे होणारे वाद आणखीच वाढले आहे. ‘नो पार्किंग’मधील दुचाकी चालकासमोर उचलून टोइंगचे बेकायदा शुल्क उकळणे तसेच गाडी उचलणाऱ्या तरुणांची अरेरावी अशा तक्रारी वाहतूक पोलिसांविरोधात वाढत आहेत.अशातच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. ज्यामध्ये पुण्यात एका काकांची नो पार्किंगमधली स्कूटी उचलल्यानंतर त्या काकांनी काय केलं पाहा. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, “पुणेकरांचा नाद कुणीच करु शकत नाही”
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा