पुणेकरांच्या नादाला लागू नये असे म्हणतात ते उगाच नाही. पुणेकर कधीही इतरांची आरेरावी सहन करून घेत नाही, स्पष्ट शब्दात बोलतात आणि समोरच्याला त्याची चूक दाखवून देतात. पुणेकरांना त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाते. मोजक्या शब्दात ते समोरच्याला त्याची चूक दाखवण्याचे कौशल्य अस्सल पुणेकरांकडे हमखास असते. अनेकदा बेशिस्त नागरिकांना शिस्त लावण्यासाठी पुणेकर त्यांची पुणेरी शैली वापरताना दिसतात. बेशिस्त लोकांना टोला लगावणाऱ्या अनेक पाट्या पुण्यात पाहायला मिळतात पण प्रत्यक्षात कोणी बेशिस्त व्यक्ती भेटला तर त्याला अद्दल घडवल्याशिवाय पुणेकर शांत बसत नाही. अशाच एका पुणेरी काकांचा व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक पुणेरी काका आणि दुचाकी चालकाचा वाद सुरु असल्याचे दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण काही अंतरावरून एका दुचाकी चालकाचा आणि पुणेरी काकांचा व्हिडिओ शुट करताना दिसत आहे. तरुण हळू हळू दोघांजवळ जातो आणि काय झाले असे विचारतो. दुचाकी चालक नियमभंग करून सायकल ट्रकवरून दुचाकी चालवत आहे तेही विरुद्ध दिशेने. म्हणून पुणेरी काका आपली सायकल दुचाकीस्वाराच्या दुचाकीसमोर उभी करून त्याची वाट अडवत आहे जेणेकरून त्यांनी आपली चूक मान्य करावी पण बेशिस्त दुचाकी चालक पुणेरी काकांवर आरेरावी करताना दिसत आहे. तो सायकल हाताने खेचून बाजूला करतो आणि चुकीची माफी न मागताच निघून जातो. दरम्यान व्हिडिओ शुट करणारा तरुण काकांना विचारतो, चुकीच्या बाजूने आला होता, चुकीचे आहे हे. काका म्हणतात,”तेच सिद्ध करणार होतो मी.”

हेही वाचा – रीलसाठी तरुणाने रेल्वेच्या डब्यातील सीट कव्हर फाडले अन् चालत्या ट्रेनच्या खिडकीतून…Viral Video पाहून भडकले नेटकरी

हेही वाचा –ही कसली सफाई? कडाक्याच्या थंडीत रात्री रेल्वे स्थानकावर झोपलेल्या प्रवाशांवर फेकलं थंड पाणी; Video Viral पाहून नागरिकांचा संताप

व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी पुणेरी काकांच्या प्रयत्नाचे कौतुक केले आणि बेशिस्त दुचाकी चालकावर टिका करत रोष व्यक्त केला. एकाने कमेंट केली, “आजोबांचा सत्कार करा”
दुसरा म्हणाला की,”सायकलचा रस्ता आहे. चुकीच्या बाजूने दुचाकी चालवत आहे, तेही सायकल ट्रॅकवर”
तिसऱ्याने कमेंट केली, “पुणेरी तात्या रॉक!”
चौथ्याने कमेंट केली, “पुणे तिथे काय उणे!”