पुणे आणि पुणेकर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. त्यापैकी एक कारण म्हणजे वाहतूकीचे नियम. पुण्यात असे अनेक लोक आहेत जे वाहतुकीचे नियमांचे पालन करत नाही. अनेक बेशिस्त वाहनचालक सर्रासपणे वाहतूकीचे नियम मोडताना दिसतात मग ते हेल्मेट न परिधान करणे असो किंवा पदपथावरून दुचाकी चालवणे असो…. सध्या अशाच बेशिस्त वाहनचालकांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाहतूकीचे नियम सर्रासपणे मोडणाऱ्या दुचाकी चालकांनी आता हद्द पार केली आहे. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे.
बेशिस्त वाहनचालकांचा व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावर पुणेरी पाट्या आणि पुणेकरांची अनेक व्हिडिओ रोज व्हायरल होत असतात जे लोकांचे मनोरंजन करतात पण सध्या असा व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पाहून नेटकऱ्यांनी धक्का बसला आहे. वाहतूकीच्या नियमांचे वारंवार पालन करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांकडून केले जाते तरीही सर्रासपणे वाहतूक नियम भंग केले जातात. अशीच काहीशी घटना सध्या चर्चेत आली आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये पुण्यातील आहे जिथे रस्ता ओलांडण्यासाठी काही लोक थेट दुभाजक फोडताना दिसत आहे. एक व्यक्ती हातात दगड घेऊन दुभाजक फोडताना दिसत आहे जेणेकरून दुचाकी रस्ता ओलांडू शकतील. व्हिडिओ पाहूने अनेकांनी रोष व्यक्त केला आहे.
इंस्टाग्रामवर whatsinpune नावाच्या पेजवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शन लिहिले आहे की, “Pune Is Not For Beginner”(नवख्या लोकांसाठी पुणे शहर नाही)
हेही वाचा – वडापाव विक्रेता महिन्याला किती पैसे कमावतो? Vloggerने स्वत: केली विक्री, पाहा Viral Video
येथे पाहा व्हिडीओ
हेही वाचा – भारतात Instagram बंद पडल्याने वापरकर्ते हैराण! #instagramdown हॅशटॅग होतोय ट्रेंड
व्हिडिओ पाहून अनेकांनी रोष व्यक्त केला. एकाने कमेंट केली की,” अरे हे कुठून तरी येतात आणि आमच्या पुण्याचं नाव खराब करतात.”
दुसऱ्याने बीआरटी लेनमध्ये घुसा आणि मग दुभाजक तोडून सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करा”
तिसऱ्याने कमेंट केली की, “सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करू नका”
चौथ्याने कमेंट केली की, “आमच्या टँक्सच्या पैशांमधून बांधतात आणि असले मूर्ख दीड शाहणे लोकं तोडतात”
पाचवा म्हणाला की, असे करतात आणि म्हणतात की, इथे रस्ता ठीक नाही आणि पुण्यात काय ठीक नाही”
सहावा म्हणाला,”बावळट, पुण्यात पुण्यापेक्षा बाहेरचे लोक जास्ती आहेत आणि पुण्याचं नाव खराब करत आहेत”