Viral Video : पुणे हे देशातील एक ऐतिहासिक आणि सुंदर शहर आहे. सांस्कृतिक वारसा जपणारे हे शहर अत्यंत लोकप्रिय आहे. येथील ऐतिहासिक वास्तू, खाद्यसंस्कृती आणि पुणेरी पाट्या आणि बऱ्याच गोष्टी चर्चेत येतात. पुणे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे. शनिवारवाडा, लाल महाल, सिंहगड, तुळशीबाग, असे कितीतरी लोकप्रिय स्थळ आहे. पण तुम्ही पुण्यातील एक सुंदर मंदिर पाहिले आहे का? सध्या सोशल मीडियावर या मंदिराचे फोटो किंवा व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. आज आपण याच मंदिराविषयी जाणून घेणार आहोत.

या व्हिडीओमध्ये तुम्हाला एक सुंदर मंदिर दिसेन. या मंदिराचा परिसर अतिशय शांत आणि नयनरम्य दिसत आहे. मंदिराची कलाकृती अत्यंत सुंदर असून मंदिराकडे एकसारखे बघावसे वाटते. रात्रीच्या अंधारात सोनेरी रंगाने हे मंदिर सर्वांचे लक्ष वेधून घेते. या व्हिडीओवर कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पुण्याजवळील सुंदर मंदिर.. जय जय रामकृष्ण हरी”

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Jaya Kishori Viral Photo fact check
जया किशोरींनी सुरू केले मॉडेलिंग! व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण; वाचा, नेमकं सत्य काय?
Paaru
Video : अनुष्का आदित्यच्या घरातील व्यक्तीचा अपघात घडवून आणणार? पारूला सत्य समजणार का? पाहा प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Lalu Prasad Yadav Controversial comment
Lalu Prasad Yadav Video : “नयन सेंकने….”; नितीश कुमार यांच्या महिला संवाद यात्रेबद्दल लालू प्रसाद यादव यांचं आक्षेपार्ह वक्तव्य
pune video : 80 years old lady selling panipuri
पुण्यातील ८० वर्षांची आज्जी विकते पाणी पुरी, Viral Video एकदा पाहाच
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो

हा व्हायरल व्हिडीओ पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरातील आहे. पिंपरी चिंचवड परिसरातील रहाटणी येथे शिवराज नगर, काळेवाडी फाट्याजवळ हे सुंदर विष्णूचे मंदिर आहे. या मंदिराला विष्णू धाम सुद्धा म्हणतात. याशिवाय हे सुंदर मंदिर चारभुजा मंदिर म्हणून सुद्धा ओळखले जाते.हे मंदिर पाहण्यासाठी पुण्यातील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. तुम्हाला या मंदिराला नक्की भेट देऊ शकता.

हेही वाचा : Video : होळीच्या रंगात न्हाऊन निघाली ‘इडली’! पाहा या रंगीत नाश्त्याची व्हायरल होणारी भन्नाट रेसिपी

iloovepune या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पुण्याजवळील सुंदर मंदिर..विष्णू मंदिर,रहाटणी..” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिली आहे. एका युजरने लिहिलेय, “खूप सुंदर मंदिर आहे” तर एका युजरने लिहिलेय, “अप्रतिम आणि सुंदर वास्तू” काही युजर्सनी हे मंदिर कुठे आहे, हे विचारले आहे तर काही युजर्सनी या मंदिराचा पत्ता सांगितला आहे.

Story img Loader