Pune Video : पुणे हे महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक शहर आहे. या शहराचा इतिहास या शहराची ओळख सांगतो. येथील अनेक ठिकाणे बघण्यासाठी लोक दूरवरून येतात. पुण्यातील शनिवार वाडा, दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, लाल महाल, सिंहगड, खडकवासला धरण, इत्यादी लोकप्रिय ठिकाणे आवर्जून बघतात पण पुण्याजवळ असे अनेक सुंदर ठिकाणे आहेत, ज्याविषयी अनेक लोकांना माहिती नाही. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पुण्यापासून ५० किमीवर असलेल्या एका सुंदर मंदिराविषयी सांगितले आहे. हे सुंदर मंदिर आणि तेथील तलाव पाहून कोणीही थक्क होईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (pune video a beautiful Ghateshwar Shiv Temple shindewadi only 50 km from pune video goes viral on social media)
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक सुंदर मंदिर दिसेल. या मंदिराच्या परिसरात सुंदर तलाव आहे. हा तलाव या ठिकाणाच्या सौंदर्यात आणखी भर घालतो. या मंदिराच्या परिसरात खूप सारी हिरवीगार झाडे आहेत. तलावामुळे हा परिसर अतिशय थंड व शांत वाटतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की येथे कोणते मंदिर आहे तर या ठिकाणी शिव मंदिर आहे आणि हे मंदिर घाटेश्वर शिवमंदिर म्हणून ओळखले जाते. मंदिराचा परिसर खूप मोठा असून अतिशय आकर्षक आहे. या व्हिडीओवर लिहिलेय, “सुंदर तलाव आणि सुंदर शिवाचे मंदिर पिंपरी चिंचवड पासून फक्त ३० किमीवर आणि पुण्यापासून ५० किमीवर आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ
all_aboutt_adventure या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “ही शिंदेवाडी आहे” तर एका युजरने लिहिलेय, “कृपया ही जागा खराब करू नका” आणखी एका युजरने लिहिलेय, “खूप शांत जागा आहे.”
हे घाटेश्वर शिव मंदिर निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं एक सुंदर आणि मनाला प्रसन्न करणारे ठिकाण आहे. वडेश्वर गावातील शिंदेवाडी येथे हे प्राचीन मंदिर आहे. अनेक पर्यटक आणि भाविक दर्शनासाठी येथे नेहमी गर्दी करतात.