Viral Video : पुणे हे ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. येथील ऐतिहासिक वास्तू, प्राचीन मंदिरे, संस्कृती या शहराची खास ओळख आहे. पु्ण्यात अनेक प्राचीन मंदिरे असून प्रत्येक मंदिराचा स्वत:चा एक इतिहास आहे. काही सुंदर मंदिरे नव्याने बांधण्यात आली आहे. सोशल मीडियावर पु्ण्यातील अनेक आकर्षक मंदिरांचे व्हिडीओ किंवा फोटो व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक सुंदर मंदिर दाखवले आहेत. व्हिडीओती मंदिर पाहून तुम्हीही थक्क व्हाल. आज आपण याच मंदिराविषयी जाणून घेणार आहोत. (pune video a beautiful temple of balaji)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक सुंदर मंदिर दिसेल. व्हिडीओमध्ये तुम्हाला मंदिराचे भव्य द्वार, मंदिराचा सुंदर परिसर दिसेल.त्यानंतर तुम्हाला विलोभनीय बालाजीची मूर्ती दिसेल. या मूर्तीला पाहून तुम्हीही थक्क व्हाल. अतिशय आकर्षक अशी ही मूर्ती असून कोणाला पुन्हा पुन्हा या मूर्तीचे दर्शन घ्यावेसे वाटेल. त्यानंतर मंदिर परिसरातील अनेक लहान मोठ्या मूर्ती दिसतील.थोडे उंचावर असलेले हे मंदिर दिसायला अतिशय आर्कषक असून तितकेच नयनरम्य आहे. या व्हिडीओवर कॅप्शनमध्ये लिहिलेय, “गेला आहात का पुण्याजवळील या बालाजी मंदिरात”

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : Zomato कडून मोठी चूक; शाकाहारी गर्भवती महिलेला पाठवली नॉनव्हेज थाळी; Photo शेअर करीत पती म्हणाला, “माझ्या पत्नीला त्रास…”

iloovepune इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “बालाजी मंदिर, कात्रज” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “अप्रतिम जागा… मंदिरामध्ये गेले होतो एक वेगळच फिल होतं.. तिथून थोड पुढे गेलं की दत्तांच खूप मोठा ठाणे नारायण पूर्ण होते ज्याला आपण म्हणतो ना भक्तीचा सुंगध आणि सुंगधाकडे आकर्षण होते आणि माणूस तिथे जातो जणून काही स्वर्गामध्ये गेल्यासारखे वाटते” आणखी एका युजरने लिहिलेय, “माझ्या घराशेजारीज आहे” काही युजर्स म्हणाले, हे इस्कॉन मंदिर आहे”

यापूर्वी सुद्धा पुण्यातील असाच एका मंदिराचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.  पिंपरी चिंचवड परिसरातील रहाटणी येथे शिवराज नगर, काळेवाडी फाट्याजवळ हे सुंदर विष्णूचे मंदिर होते. त्या मंदिराला विष्णू धाम सुद्धा म्हणतात. रात्रीच्या अंधारात सोनेरी रंगाने हे मंदिर सर्वांचे लक्ष वेधून घेते. शनिवारी रविवारी या मंदिरात पुणेकरांची खूप गर्दी असते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune video a beautiful temple of balaji iskcon temple katraj video goes viral on social media ndj
Show comments