Pune Viral Video : पुणे हे महाराष्ट्रातील एक लोकप्रिय शहर आहे. या शहराचा इतिहास, येथील संस्कृती या शहराची ओळख आहे. पुण्यातील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. विशेषत: पुण्यातील वाहतूक कोंडी नेहमी चर्चेचा विषय असतो पण येथील वाहतूक पोलीस नेहमी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करतात. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. पुण्यातील नवले ब्रिजजवळ एका माणसाने चक्क वाहतूक पोलिसाची कॉलर पकडत गैरवर्तन केल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
भर रस्त्यात वाहतूक पोलिसाची चक्क कॉलर पकडली, पुण्यातील धक्कादायक व्हिडीओ
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की पुण्यातील नवले ब्रिजजवळ चक्क वाहतूक एक व्यक्ती पोलिसांबरोबर गैरवर्तन करताना दिसत आहे. त्याने वाहतूक पोलिसांची कॉलर पकडली. मीडिया रिपोर्टनुसार, ड्रंक अँड ड्राइव्ह ची चेकिंग करत असताना हा प्रकार घडला आहे. दारुच्या नशेत या व्यक्तीने वाहतूक पोलिसांबरोबर गैरवर्तन केले आहे.
पुणे शहरात विविध ठिकाणी वाहतूक पोलिसांकडून नियम भंग करणाऱ्या वाहन चालकांवर करण्यात कारवाई करण्यात येत आहे. अशीच कारवाई करताना नवले ब्रिजवर ही घटना घडली. मद्यप्राशन करून या व्यक्तीकडून वाहतूक पोलिसांबरोबर गैरवर्तन करणे, चांगलेच महागात पडले. पुणे पोलीसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Pune Viral Video)
यापूर्वी सुद्धा असे अनेक व्हिडीओ पुण्यातील व्हायरल झाले आहेत. पुणे शहर पोलिस नेहमी ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ या मोहिमेंतर्गत वाहनांची तपासणी करतात. दुचाकी आणि चार चाकी वाहन चालक दारु पिऊन गाडी चालवत असेल तर त्यांच्यावर कारवाई करतात. ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’मुळे अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अपघाताला आळा बसवण्यासाठी याविरोधात पुणे वाहतूक पोलीस कारवाई करतात. ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ म्हणजेच मद्यपान करून गाडी चालवणे हा एक दंडनीय गुन्हा आहे आणि मोटार वाहन कायदा २०१९ च्या कलम १८५ नुसार, मद्यपान करून वाहन चालवणे हे बेकायदेशीर मानले जाते. यासाठी दंड आकारला जातो. काही प्रसंगी तुरुंगवास होऊ शकतो.
© IE Online Media Services (P) Ltd