Viral Video : सोशल मीडियावर डान्सचे व्हिडीओ दररोज व्हायरल होत असतात. काही डान्सचे व्हिडीओ मजेशीर असतात तर काही डान्सचे व्हिडाओ थक्क करणारे असतात. लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत अनेक जण डान्स करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक वृद्ध आजोबा डान्स करताना दिसत आहे. आजोबांचा डान्स पाहून कोणीही थक्क होईल. पुण्याचे हे आजोबा भन्नाट डान्स करताना दिसत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका सार्वजानिक कार्यक्रमानिमित्त डिजे लावला आहे. या डिजेच्या तालावर हे आजोबा डान्स करत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला लोकांची भयंकर गर्दी दिसून येईल. हे लोक सुद्धा डिजेच्या तालावर डान्स करत आहे पण हे आजोबा चक्क ट्रॅक्टरवर चढून डान्स करत आहे आणि सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. काकांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून कोणीही थक्क होईल. अप्रतिम असा डान्स काका करत आहे. काकांची ऊर्जा पाहून कोणीही अवाक् होईल. तरुणांना लाजवेल असा ते डान्स करताना दिसत आहे.
हा व्हिडीओ पुण्यातील गोखले नगरचा असल्याचे कमेंटमध्ये युजर्स म्हणताहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे वृद्ध आजोबा कोण आहेत? तर हे पुण्यातील लोकप्रिय गृहस्थ आहे. त्यांना लोक कामत काका म्हणून ओळखतात. ते अनेक सार्वजानिक ठिकाणी आवडीने डान्स करतात. त्यांचे डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)
_hindu_samrajya_group या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “International Brand With International Vishay” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “कामत काका ऑन फायर” तर एका युजरने लिहिलेय, “कामत काकांनी गाजवल रे…..” आणखी एका युजरने लिहिलेय, “कामत काका नादखुळा” एक युजर लिहितो, “गोखले नगर बोलते” अनेक युजर्सनी या व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये काकांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. काही युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.