सोशल मीडियावर पुण्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुळशीबाग येथील बाजारपेठेत एक गृहस्थ अनोख्या पद्धतीने त्यांच्या दुकानाचे मार्केटींग करताना दिसत आहे. त्यांचा हा व्हिडीओ पाहून कोणीही म्हणेल, “पुणे तिथे काय उणे” सध्या हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पुणे हे देशातील एक ऐतिहासिक शहर आहे. या शहराला सांस्कृतिक तसाच पारंपारिक वारसा लाभला आहे. शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखले जाणारे पुणे प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे.येथील ऐतिहासिक वास्तू असो किंवा पुण्याच्या पाट्या, खांद्यसंस्कृतीपासून येथील महत्त्वाच्या बाजारपेठासुद्धा खूप जास्त लोकप्रिय आहे. जर तुम्ही पुण्याला आला तर तुळशीबाग या बाजारपेठला नक्की भेट द्या.तुळशीबागचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच या काकांचा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरलाय.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की हे काका दुकानासमोर उभे राहून ग्राहकांना दुकानांना भेट देण्याची विनंती करत आहे. त्यांची मार्केटींग करतानाची अनोखी शैली पाहून तु्म्हीही भारावून जाल. काका दुकानासमोर उभे राहून म्हणतात, “तेरा ध्यान किधर है, चिकन करी अंदर है..तेरा ध्यान किधर है, चिकन करी अंदर है. तिकडे बघा, इकडे घ्या.. तिकडे बघा , इकडे घ्या.. शंभर रुपयांना दोन आहे, आज आमच्या दुकानाचा वाढदिवस आहे, शंभर रुपयांना दोन टॉप आहे.. संध्याकाळी खवा आईस्क्रिम फुकट आहे..” काकांची ही अनोखी शैली पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

हेही वाचा : बापरे! स्विगीवरुन मागवलेल्या जेवणात आढळली औषधाची गोळी, फोटो पाहून तुम्हालाही धक्का बसेल

destination_pune या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय,”पुणे तिथे काय उणे…तुळशीबाग, पुणे” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “एक नंबर, वाक्यरचना..शेवटी पुणेकर ओ…” तर एका युजरने लिहिलेय, “मार्केटींग लेव्हल एक नंबर” आणखी एका युजरने लिहिलेय, “यालाच म्हणतात खरी मार्केटिंग” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.