Pune Video : पुण्यातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. या शहराचा इतिहास खूप मोठा आहे. महाराष्ट्रातील सांस्कृतिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात ऐतिहासिक वास्तू, प्राचीन मंदिरे आहेत. येथील संस्कृती, भाषा या शहराची ओळख आहे. पुण्यात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे पुणे हे जगभरात ओळखले जाते. त्यातीलच एक गोष्ट म्हणजे पुणेरी पाट्या.
पुणेरी पाट्या म्हणजे पुणेकरांची मार्मिक टिप्पणी असते. कधी खोचक शब्दांमध्ये तर मजेशीर शब्दांमध्ये सूचना लिहिलेल्या असतात. सध्या अशीच एक पुणेरी पाटी चर्चेत आली आहे. या पुणेरी पाटीचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. (pune video a message written on puneri paati just turned around on a street funny video goes viral on social media)
ही पुणेरी पाटी कशासाठी? (puneri paati )
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक रस्ता दिसेल. या व्हिडीओमध्ये तुम्हाला भला मोठा फलक दिसेल. या फलकावर लिहिलेय, “चला गोल फिरा!!!” सध्या पुण्यात अनेक ठिकाणी रस्त्यांचे तसेच मेट्रोचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे काही रस्ते बंद आहेत तर काही नवीन रस्ते सुरू केले आहेत. याच कारणाने पुण्यात ट्रॅफीक सुद्धा वाढलंय. या व्हायरल व्हिडीओमध्ये फलकावर लिहिलेला मेसेज हा वाहकांना योग्य रस्ता दाखवण्यासाठी लिहिलेला आहे. या व्हिडीओवर लिहिलेय, “फक्त पुणेकरच हे पाटी लावू शकतात”
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
punekar2.0_og या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पुणेकर बोलते- चला गोल फिरा” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “हो मग लोकाना कळायला पाहीजे” तर एका युजरने लिहिलेय, “कात्रजला आहे हे” आणखी एका युजरने लिहिलेय, “कात्रज चौकमध्ये काम सुरू आहे” काही युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. यापूर्वी सुद्धा अशा अनेक पुणेरी पाट्यांचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.