Viral Video : चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत रविवारी (२३ मार्च) दुबईत भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगला. या सामन्यात भारताने पाकिस्तानवर सहा गडी राखून दणदणीत विजय मिळवला. भारत पाकिस्तान सामना म्हणजे भारतीयांसाठी एक रोमांचक अनुभव असतो. जर या सामन्यात भारत जिंकला तर दसरा दिवाळी सारखा जल्लोष देशभरात साजरा केला जातो. या बहुचर्चित भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात भारताने विजय मिळवल्यानंतर सगळीकडे एकच जल्लोष पाहायला मिळत आहे. गावात शहरात तसेच सोशल मीडियावर लोक आनंद साजरा करताना दिसत आहे. सध्या असाच एक पुण्यातील व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आनंदाच्या भरात एक क्रिकेटप्रेमी चक्क टिव्ही फोडताना दिसतो. हा व्हिडीओ पाहून काही लोकांना कदाचित धक्का बसेल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

मॅच जिंकल्याच्या आनंदात फोडला चक्क टिव्ही

हा व्हायरल व्हिडीओ पुण्यातील एफसी रोडवरील आहे. हे पुण्यातील एकमेव असं ठिकाण आहे जिथे लोक दसरा, दिवाळी, होळी, नवीन वर्ष किंवा कोणताही आनंदाचा क्षण असो, एकत्र येऊन साजरा करतात. भारताच्या दणदणीत विजयानंतर रविवारी रात्र येथे जल्लोष पाहायला मिळाला. या एफसी रोडवरील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. असाच एका व्हिडीओत एक तरुण चक्क टिव्ही फोडताना दिसतो.
या व्हायरल व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एक तरुण टिव्ही आणतो आणि हा टिव्ही डोक्यावर मारत फोडण्याचा प्रयत्न करतो त्यानंतर तरुण जोराने जमीनीवर टिव्ही आपटतो. या तरुणाला टिव्ही फोडताना पाहून सर्व जण थक्क होतात. ताही लोक व्हिडीओ शूट करताना दिसतात. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ (Watch Viral Video)

ashishshiraleofficial या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शमध्ये लिहिलेय, “भीतीचे दुसरे नाव पुणे आहे” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “TV तोडायचं कारण काय??” तर एका युजरने लिहिलेय, “ह्यांना एकच शब्द आहे ” ढ ” उत्तम उदाहरण” आणखी एका युजरने लिहिलेय, “आधी हरल्यावर फोडायचे आता जिंकल्यावर फोडताय” एक युजर लिहितो, “पाकिस्तानमध्ये हरल्यावर टिव्ही फोडतात पण आपल्याकडे जिंकल्यावर टिव्ही फोडतात.” अनेक युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.

Story img Loader