Pune Video : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे नागरिकांचे नुकसान होत आहे. पुणेकरांना पावसाचा त्रास सहन करावा लागत आहे तर अनेक ठिकाणी वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. पुण्यातील पाऊस नेहमी चर्चेचा विषय ठरतो. सोशल मीडियावर पुण्यातील पावसाचे असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. सध्या एक असाच व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये भर रस्त्यात एक महिला मुसळधार पावसात कारमध्ये अडकलेली दिसत आहे. विमाननगर परिसरातील हा व्हिडीओ आहे. व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक महिला भर पावसात कारमध्ये बसलेली आहे आणि ती कारच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे पण कारच्या अवतीभोवती गुडघाभर पाणी असल्यामुळे ती बाहेर पडू शकत नाही तेव्हा ती मदत मागताना दिसते. तेव्हा दोन पोलीस तिथे येतात आणि त्या महिलेला बाहेर काढतात. हा व्हिडीओ विमाननगर येथील आहे जो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये मदत करणाऱ्या पोलिसांचे सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस आहे. अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचले आहेत.

Navi Mumbai Accident
VIDEO : विरुद्ध दिशेने वाहन चालवणं नवी मुंबईतील दोन तरुणींच्या जीवावर बेतलं; कारच्या धडकेत मृत्यू
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
youth assaults on duty traffic police at pune
Video: एवढा माज कुठून येतो? पुण्यात वाहतूक पोलिसाला भररस्त्यात मारहाण, व्हिडीओ व्हायरल
Viral Video Drunk Man Pinned Down By Ticket Checker Train Attendant Flogs Him
“लाथा-बुक्या मारल्या, अन् पट्ट्याने धू धू धूतले! तरुणीला छेडणाऱ्या मद्यधुंद व्यक्तीला टीसी आणि ट्रेन अटेंडंटने दिला चोप, Video Viral
Horrible incident at the Kaziranga National Park in Assam shocking video
VIDEO: मृत्यू समोर दिसतो तेव्हा…समोर २ गेंडे अन् अचानक जिपमधून मायलेकी खाली पडल्या; जंगलातला थरारक शेवट आला समोर
tourists get stuck in frozen lake in Arunachal Pradesh
गोठलेल्या तलावावर चालताना अचानक बर्फ तुटला अन् पर्यटक अडकले, धक्कादायक VIDEO होतोय व्हायरल
Shocking video In Amroha, Uttar Pradesh, a girlfriend was thrown on the road and strangled
VIDEO: जेव्हा प्रेम भयानक रूप धारण करतं! भर रस्त्यात गर्लफ्रेंडच्या हत्येचा प्रयत्न; खाली पाडलं, ओढणीनं गळा आवळला अन्…
Shocking video girls in up baghpat fight over boyfriend on Road thrilling video went viral
प्रेमाचा हिंसक खेळ! कपडे फाटले तरी भान नाही; बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा भर रस्त्यात तुफान राडा, VIDEO पाहून व्हाल हैराण

हेही वाचा : बाप-लेकीच्या आयुष्यातला अनमोल क्षण; बाबांनी दिलेलं गिफ्ट पाहून चिमुरडी झाली खूश, एक्स्प्रेशनची होतेय चर्चा; VIDEO तुफान व्हायरल

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : Video : “देवेंद्र फडणवीस म्हणाले मी पुन्हा येईन…” नवरदेवाने घेतला भन्नाट उखाणा, व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल

punekarnews या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “एक महिला चालक विमाननगर येथे एका कठीण परिस्थितीत दिसून आली. ती कारमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हा पुणे शहर वाहतूक विभागाने लगेच मदत केली आणि तिला व्यवस्थितपणे बाहेर काढण्यात आले”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “ज्या अधिकाऱ्यांनी मदत केली त्यांचे खरंच आभार” तर एका युजरने लिहिलेय,”हे खूप धोकादायक आहे. गुडघ्यापर्यंत पाणी होते. ती चालत का गेली नाही” आणि एका युजरने लिहिलेय, “निसर्गाशी जीवघेणा खेळ, विकासाची ऐसी की तैसी” अनेक युजर्स सुरक्षा रक्षकांचे आभार मानले आहेत.

Story img Loader