Pune Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ भावूक करणारे असतात. काही व्हिडीओ पाहून हसू येते तर काही व्हिडीओ पाहून डोळ्यात पाणी येते.

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण एक काकाबरोबर प्रँक करायला जातो आणि शेवटी भावूक होतो. हा व्हिडीओ पुण्यातील आहे. जाणून घेऊ या, या तरुणाने पुणेकर काकांबरोबर नेमका कोणता पँक केला आणि पुढे काय घडले?

Shocking video Nilgai Calf Swallowed By Python Villagers Come To Rescue See What Happens Next Video Goes Viral
महाकाय अजगराने निलगायीला जिवंत गिळलं; गावकऱ्यांनी पोट दाबून पिल्लू काढलं बाहेर, VIDEO पाहून तुम्हीच सांगा हे कितपत योग्य
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
alcoholic father sexual abuse 14 year old girl by threatening to kill her
बाप नव्हे राक्षसच… पत्नी बाहेर जाताच करायचा मुलीवर बलात्कार
sandha badaltana Do old items expire
सांधा बदलताना : या भवनातील गीत पुराणे?
Govinda discharged from hospital
Govinda Discharge from Hospital: पायाला गोळी कशी लागली? गोविदांनं सांगितला त्यादिवशी घडलेला घटनाक्रम
Navratri wishes in marathi | Ghatasthapana 2024 | Navratri 2024
Navratri Wishes 2024 : नवरात्रीच्या द्या प्रियजनांना हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर मेसेज
नीलेश पानमंद lawyer amit katarnavare recreate akshay shinde encounter incident
“अक्षय शिंदे चकमकीचा लवकरच उलगडा करेन”, वकिलांनी उभा केला चकमकीचा प्रसंग
Heart warming video of father and son after passing exam emotional video
“आयुष्यभराचं बापाचं कर्ज, मुठभर गुलालात फेडलं” बाप-लेकाचा हा VIDEO पाहून प्रत्येकाच्या डोळ्यांत येईल पाणी

पुणेकर काकांबरोबर तरुणाने केला प्रँक

या व्हिडीओमध्ये तुम्हाला एक तरुण दिसेल जो एका रस्त्यावरचा केरकचरा उचलणाऱ्या काकांना कात्रजच्या स्टॉपचा पत्ता विचारतो. तरुण म्हणतो, “मी इथे नवीन आलोय. मला कात्रजच्या बस स्टॉपला जायचे आहे.” तेव्हा काका विचारतात, “पीएमटीने जायचं आहे का?” तितक्यात आणखी एक व्यक्ती येते आणि पत्ता विचारणाऱ्या तरुणाला कात्रजचे बसस्टॉप येथे समोर असल्याचे सांगतो.
तेव्हा काकाही म्हणतात, “हो जवळच आहे.”

तरुण विचारतो,”पत्ता सांगायचे किती रुपये घेता?” तेव्हा पत्ता सांगणारी व्यक्ती म्हणते, “५०० रुपये.” तेव्हा काका शांतपणे बघतात. तरुण त्या व्यक्तीला ५०० रुपये देतो आणि काकांना विचारतो की पत्ता सांगण्याचे तुम्हाला किती रुपये द्यायचे? तेव्हा काका म्हणतात,” काही नाही. मला काय करायचं.. आपण कष्ट करून खातो” तेव्हा तरुण विचारतो, “त्यांनी कशासाठी घेतले” तेव्हा काका म्हणतात, “काय माहीत आता आपल्याला काय करायचं” तेव्हा तरुण म्हणतो, “तुम्हीही घ्या. त्यांनी ५०० रुपये घेतले आता तुम्ही पण घ्या” तेव्हा काका म्हणतात, नाही, म्हटलं हे बास्स झालं.”

शेवटी तरुण म्हणतो, “लय भारी इमानदार आहात तुम्ही, एक नंबर. ५०० रुपये घेऊन जाणारा तो आमचाच माणूस आहे आम्ही बघत होतो की तुम्ही पैसे घेता की ना पण तुम्ही घेतले नाही तेव्हा हे पैसे ठेवाच.” प्रँक करणारा तरुण काकांच्या खिशात पैसे टाकतो आणि काकांना हा प्रँक असल्याचे सांगतो. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : शौचास बसलेल्या व्यक्तीच्या शरीराला भलामोठ्या अजगराचा विळखा अन् गिळणार तितक्यात…; जंगलातील धडकी भरविणारा Video Viral

पाहा व्हायरल व्हिडीओ

prank_maza_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “प्रँकचे भावनिक व्हिडीओमध्ये रुपांतर झाले.”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “इमानदारी रक्तात असावी लागते” तर एका युजरने लिहिलेय, “काय लिहावं शब्दच सुचत नाहीत. तुमचे व्हिडिओ बघितले की मनाला खूप म्हणजे खूप चांगलं वाटतं. माझा आज मूड खराब होता मी इन्स्टा ओपन केला आणि पहिलाच व्हिडिओ तुमचा पहिला, नकळत डोळ्यात पाणी पण आले आणि हसू पण आले. कुठून सुचतं तुम्हाला असे व्हिडिओ बनवायचे, व्हिडिओ मात्र लय भारी”

आणखी एका युजरने लिहिलेय, “मराठी व्हिडिओ, मराठी प्रॅन्क. ..रिअल हिरो आहात दादा तुम्ही आमच्या साठी” एक युजर लिहितो, “खरच खूप मोठं मन आहे बाबांचं”