Pune Video : ऐतिहासिक शहर म्हणून पुण्याची एक आगळी वेगळी ओळख आहे. येथील ऐतिहासिक वास्तू, संस्कृती, खाद्य संस्कृती, पुणेरी भाषा आणि पुणेरी पाट्या नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असतात. पुण्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर दर दिवशी व्हायरल होत असतात. सध्या असाच एका पुणेरी आजीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आजी पाणी पुरी विकताना दिसत आहे. या आजीने तिच्या स्टॉलचे नाव सुद्धा “आजीची पाणीपुरी” असे ठेवले आहे. तुम्ही या आजीची पाणीपुरी खाल्ली का? जर नाही तर तर हा व्हिडीओ नक्की पाहा.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक पाणी पुरीचा स्टॉल दिसेल. या स्टॉलवर एक आजी अप्रतिम अशी भेळ बनवताना दिसत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की या स्टॉलचे नाव “आजीची पाणीपुरी” असे आहे. ती या स्टॉलवर पाणीपुरी, शेवपुरी, रगडापुरी, ओली भेळ, महाराष्ट्रीयन भेळ, मटकी भेळ विकते. आजीने स्टॉलवर लावलेल्या बोर्डवर लिहिलेय, “२० वर्षाची परंपरा आजीची पाणीपुरी घरगुती पाट्यावरची पाणीपुरी” त्यानंतर बोर्डवर विविध चाटचे प्रकार आणि त्याच्या किंमती लिहिल्या आहेत. पार्सल सुविधा उपलब्ध असल्याचे बोर्डवर लिहिलेय. या व्हिडीओवर बॉलीवूडमधील आयकॉनिक गाणं लावलं आहे, “जिंदगी का सफर.. है कैसा सफर..कोई समझा नही, कोई जाना नही” या व्हिडीओवर कॅप्शनमध्ये लिहिलेय, “निगडी प्राधिकरण आज्जीची पाणीपुरी आणि भेळ तुम्ही ट्राय केली का?” पुण्यातील या आजीचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहेत.
हेही वाचा : VIDEO : लोक स्वत:च्याच जीवाशी का खेळतात? ट्रेनमधून धोकादायक पद्धतीने प्रवास करणाऱ्या लोकांचा Video Viral
pcmc.merijaan या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, ” आजीची पाणीपुरी आणि भेळ. आजीच्या प्रेमळ हातांनी बनवलेली एकदम गावाकडची चव ही एकदा अनुभवायला हवी.
पत्ता:
आजीची पाणीपुरी
सेक्टर २७, प्राधिकरण निगडी,
कॅफे टी टी एम एम जवळ”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “या आजीची गोष्ट खूप हळवी आहे. यांच्यावर खूप मोठे कर्ज आहे. रोजचे जेवढे पैसे जमतील ते कर्जफेड करतात आणि दुसऱ्या दिवशी लागतील तेवढेच पैसे ते जवळ ठेवतात. शक्य होईल तेवढ्यांनी आजीला मदत करा किंवा पाणीपुरी भेळपुरी खायला जा. तशी टेस्ट पण छान आहे यांची. भावना व्यक्त करायला लावल्या तर आजीबाई खूप रडतात. मी घेतलेला अनुभव” तर एका युजरने लिहिलेय, “काय भारी टेस्ट असेल ना आजीच्या हाताला” आणखी एका युजरने लिहिलेय, “माझ्या आजीची आठवण आली”